Team India : टीम इंडियात स्थान न मिळाल्याने या खेळाडूने उचललं मोठं पाऊल! 21 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत...

दिग्गज खेळाडूचा 21 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल....
Team-India
Team-IndiaSAKAL
Updated on

Team India : टीम इंडियातुन 32 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. यावर्षी बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या यादीतूनही या खेळाडूला वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत हा खेळाडू आता संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या खेळाडूने नुकताच सोशल मीडियावर 21 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

Team-India
Team India : स्टार खेळाडूंचे वाढते वय BCCI अन् टीम इंडियासाठी डोकेदुखी! कोण असणार पुढचा कर्णधार?

डॅशिंग फलंदाज मयंक अग्रवाल दीर्घकाळ टीम इंडियातुन बाहेर आहे आणि आता त्याला वार्षिक करारातूनही वगळण्यात आले आहे. मयंकने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली होती, त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता.

दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो पावसातही सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, जर तुम्ही स्वत:ला प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केलात तर पाऊसही तुमचा खेळ खराब करू शकत नाही.

Team-India
PCB Chairman: भारताला आव्हान देणारे नजम सेठी निघाले पळपुटे; या व्यक्तीला मिळणार अध्यक्षपदाची गादी!

भारतीय कसोटी संघाने गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. हा सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह झाला होता, त्यानंतर मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र या सामन्यात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

त्याच वेळी मयंकला आयपीएल 2023 च्या या हंगामात कामगिरी करून संघात परतण्याची संधी होती, परंतु हा खेळाडू त्यात अपयशी ठरला आहे. या मोसमातील 10 डावांमध्ये मयंकला केवळ 270 धावा करता आल्या.

Team-India
Ashes 2023: 'कोणतीही चूक केली नाही, तरीही...' सामना हरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने केले मोठे वक्तव्य

मयंकने भारतासाठी आतापर्यंत एकूण 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 5 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत.त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये 17.2 च्या सरासरीने केवळ 86 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.