Mayank Agarwal Health Update : मयंक अग्रवालला ४८ तास बोलता येणार नाही ? विषप्रयोगाच्या आरोपानंतर समोर आली मोठी अपडेट

Mayank Agarwal Health Update News : Mayank Agarwal was poisoned? टीम इंडियाच्या या बॅट्समनला अचानक फ्लाइटमधून उतरवण्यात आलं आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.
Mayank Agarwal Critical Condition Drinks Poisonous Wate Marathi News
Mayank Agarwal Critical Condition Drinks Poisonous Wate Marathi Newssakal
Updated on

Mayank Agarwal Critical Condition Drinks Poisonous Water : मंगळवार 30 जानेवारी रोजी संध्याकाळी भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवाल बाबत एक मोठी माहिती समोर आली. टीम इंडियाच्या या बॅट्समनला अचानक फ्लाइटमधून उतरवण्यात आलं आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

त्रिपुराविरुद्ध रणजी सामना खेळल्यानंतर मयंक आपल्या कर्नाटक संघासह आगरतळाहून सुरतला जात होता. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या बाटली त्याने पाणी समजून घेतली. आणि ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला. यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने तातडीने विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले.

Mayank Agarwal Critical Condition Drinks Poisonous Wate Marathi News
Under 19 Cricket World Cup : भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा ; मुशीर खानचे दुसरे शतक, २१४ धावांनी विजय

मयंकने पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, “मयांक अग्रवाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCCPS (न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशन) मध्ये तक्रार दाखल केली आहे.

मयंकच्या मॅनेजरने सांगितले की, तो जेव्हा विमानात चढत होता तेव्हा त्याच्या सीटवर एक बाटली ठेवण्यात आली होती. मग त्याने ते थोडेसे घेतले पण अचानक त्याच्या तोंडात जळजळ सुरू झाली, त्याला बोलता पण येत नव्हत, त्याला आयएलएस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याच्या तोंडाला सूज होती. मयंक धोक्याबाहेर आहे पण सूजमुळे तो 48 तास बोलू शकत नाही, आम्ही आज दुपारी 4 वाजता बेंगळुरूला जात आहोत.

Mayank Agarwal Critical Condition Drinks Poisonous Wate Marathi News
Under 19 Cricket World Cup : भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा ; मुशीर खानचे दुसरे शतक, २१४ धावांनी विजय

त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सचिव बासुदेव चक्रवर्ती यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, 'मला फोन आला की मयंक अग्रवाल आपत्कालीन परिस्थितीत दाखल झाला आहे. त्याने आपल्या सीटवर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायले आणि त्यानंतर त्याचे तोंड जळू लागले. तो धोक्याबाहेर आहे पण त्याचा चेहरा सुजला आहे आणि त्याला बोलताही येत नव्हते. त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्जही मिळू शकतो, असे क्रिकबझने सांगितले.

अन्य माहितीनुसार, तो सध्याच्या रणजी ट्रॉफीचा पुढील सामना खेळू शकणार नाही. तो कर्नाटक संघाचा कर्णधार असून जबरदस्त फॉर्मात आहे. चार सामन्यांत दोन शतकेही झळकावली.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, पाण्यामध्ये त्यांच्यावर विषारी विषप्रयोग झाला. तो इंडिगो फ्लाइट 6E 5177 मध्ये बसला होता. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतरच सत्य काय ते कळेल. हे प्रकरण हलक्यात न घेता, क्रिकेटपटूशी हे जाणूनबुजून कोणी केले का, याचाही तपास केला जाईल. कारण फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या अन्य सदस्यासोबत अशी घटना घडलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.