Kylian Mbappe : चॅम्पियन्स लीगमध्ये एमबाप्पेने मेस्सीचे रेकॉर्ड मोडले

एमबाप्पे चॅम्पियन्स लीगमध्ये केलाय खास विक्रम
Kylian Mbappe
Kylian Mbappe esakal
Updated on

पॅरिस : पीएसजीचा (Paris Saint Germain) स्टार स्ट्रायकर कायलियन एमबाप्पेने (Kylian Mbappe) चॅम्पियन्स लीग (Champions League) फुटबॉल स्पर्धेत एक खास विक्रम केला आहे. तो चॅम्पियन्स लीग (Champions League) स्पर्धेत 30 गोल्स करणारा सर्वात कमी वयाचा फुटबॉलर ठरला आहे. (Mbappe broke messi record becomes youngest player to score 30 Champions League goals)

Kylian Mbappe
Champions League : टोनी क्रूस, असेनसिओचे गोल; रियल माद्रिद टॉपवर

एमबाप्पेने मंगळवारी झालेल्या क्लब ब्रुग्गे विरुद्धच्या सामन्यात आपला 30 वा गोल मारला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये (Champions League) सर्वात कमी वयात 30 गोल पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वी त्याचाच संघसहकारी लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नावावर होता. एमबाप्पेने (Kylian Mbappe) वयाची चॅम्पियन्स लीगमधला आपला 30 वा गोल मारला त्यावेळी त्याचे वय 22 वर्षे आणि 352 दिवस इतके होते. तर मेस्सीने चॅम्पियन्स लीगमधील आपला 30 वा गोल 23 व्या वर्षी मारला होता.

Kylian Mbappe
Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पीएसजीने (Paris Saint Germain) क्लब ब्रुग्गे विरूद्धचा सामना 4 - 1 अशा गोलफरकाने जिंकला. पीएसजीकडून लिओनेल मेस्सीने आणि एमबाप्पे यांनी प्रत्येकी दोन गोल मारले. तर चॅम्पियन्स लीगमधील दुसऱ्या सामन्यात बोरुसिया डॉर्टमंडने बेसिक्टासचा 5 - 0 असा पराभव केला. तर रियल माद्रिदने इंटर मिलानचा 2 - 0 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवशे केला. तर अॅजॅक्सने स्पोर्टिंग एफसीवर 4 - 2 अशी मात केली. एट्लेटिको माद्रिदने पोर्टोचा 3 - 1 अशा गोलफरकाने पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()