मेरी कोमची राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समधून माघार

MC Mary Kom withdraw Commonwealth Games 48kg trial
MC Mary Kom withdraw Commonwealth Games 48kg trial esakal
Updated on

नवी दिल्ली : भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोमने आज राष्ट्रकुल स्पर्धेच्या 48 किली वजनी गटाच्या ट्रायल्समधून माघार घेतली. तिने दुखापतीमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सहावेळी जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या मेरी कोमला 48 किलो वजनीगटाच्या पहिल्या फेरीतच दुखापत झाली होती. आता हरियाणाची नितू राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समध्ये अंतिम फेरीत पोहचली आहे. (MC Mary Kom withdraw Commonwealth Games 48kg trial)

MC Mary Kom withdraw Commonwealth Games 48kg trial
जसप्रीत बुमराहला आयसीसीकडून तब्बल 18 महिन्यांनी मिळाले 'खास' गिफ्ट
MC Mary Kom withdraw Commonwealth Games 48kg trial
Ranji Trophy : ममता बॅनर्जींच्या क्रीडा मंत्र्याचे रणजी ट्रॉफीत शतक

2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी मेरी कोम पहिल्याच फेरीत खाली कोसळली. 39 वर्षाच्या दिग्गज बॉक्सरने झुंजार वृत्ती दाखवली. मात्र काही वेळाने तिचा डाव्या पायाच्या वेदना असह्य झाल्या. तिला रिंगबाहेर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर नितूला पंचांनी विजयी घोषित केले. आता मेरी कोमने ट्रायल्समधूनच माघार घेतली आहे. भारताची सर्वात चांगली बॉक्सर मेरी कोमच्या बर्मिंगहॅममध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.