MCA Election : 'शिंदे माझे सासरे', MCA च्या कार्यक्रमात पवारांची तुफान फटकेबाजी

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकपूर्व कार्यक्रमात राजकीय फटकेबाजीचेही रंग
MCA Election Sharad Pawar
MCA Election Sharad Pawarsakal
Updated on

MCA Election Sharad Pawar : आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते असलो, तरी खेळात कधीही राजकारण आणत नाही. त्यामुळेच आम्ही मुंबई क्रिकेट संघटनेत एकत्र आहोत, असे मत शरद पवार यांनी मांडले. मुंबई क्रिकेट संघटनेच्या आज होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात ते बोलत होते. या वेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मान्य केल्या.

MCA Election Sharad Pawar
T20 World Cup : ऑस्ट्रेलियातही उन्हाळ्यात पाऊस; IND vs PAK महामुकाबला होणार रद्द?

निमित्त होते पवार- शेलार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त स्नेहभोजनाचे. त्यासाठी शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस, आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर एकाच व्यासपीठावर येण्याचे. त्यामुळे राजकीय फटकेबाजी होत असताना मुंबई क्रिकेटसाठी आमची एकच टीम असल्याचा सर्वांनीच दाखला दिला.

मुंबई क्रिकेटसाठी तुम्ही दिलेले योगदान कोणीच विसरू शकत नाही. तुम्ही नेहमीच मुंबई क्रिकेटच्या भल्याचा विचार केला आहे, असे सांगत शिंदे आणि फडवणीस या दोघांनी पवारांच्या या मागण्या नियमात बसवून मान्य करणार असल्याचे आश्वासन दिले. तुम्ही मागणी केली आणि आम्ही ती पूर्ण केली नाही, असे होणार नाही, असे हे दोघे म्हणाले.

MCA Election Sharad Pawar
MCA Election : मुख्यमंत्र्यांची पवार - शेलार पॅनलसाठी बॅटिंग; म्हणाले काहींची झोप उडाली असेल

मी केवळ मुंबईचा विचार करत नाही, तर आपल्या महाराष्ट्रात विदर्भ आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनाही येतात, त्यांनाही अशी सूट द्यावी, असे पवार म्हणाले. त्यानंतर विदर्भासाठीची मागणी, तर लगेचच आम्ही मान्य करू, असे फडणवीस यांनी हसत हसत सांगितले.

शिंदे माझे सासरे....

पवार यांनी आमचे सासरे शिंदे आहेत (माजी क्रिकेटपटू सदू शिंदे). त्यामुळे तुम्हाला आमचे ऐकावेच लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहात म्हणताच एकच हशा पिकला. हाच धागा पकडून पवारांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या वानखेडे स्टेडियमचे लीज संपले आहे; तसेच खेळपट्ट्या आणि रिकाम्या जागेवर मैदान तयार करण्याचे मागणी केली. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी सुरक्षानिधी भरमसाट आकारला जातो, तो कमी करावा, असे गृहमंत्री फडणवीस यांना सुचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()