Media Rights Auction : बीसीसीआयने नियमात केला मोठा बदल, 'सोनी नेटवर्क अन् झी'ची होणार चांदी?

Media Rights Auction
Media Rights Auctionesakal
Updated on

Media Rights Auction : बीसीसीआने माध्यम हक्क लिलावापूर्वी आपल्या नियमात एक मोठा बदल केला आहे. या निर्णयामुळे सोनी नेटवर्क आणि झी नेटवर्क यांना मोठा फायदा होणार आहे. ते आधीपासूनच विलिनीकरणाचा प्लॅन करत होते. बीसीसीआयने काही कंपन्यांना एकत्रित येऊन माध्यम हक्क लिलावात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

बीसीसीआय आधी असे काही कंपन्यांना एकत्रित येऊन माध्याम हक्क मिळवण्यास मज्जाव केला होता. बीसीसीआयने आता आपली ही पॉलिसी बदलली आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल माध्याम हक्क लिलावावेळी देखील असेच धोरण अवलंबलं होतं. (BCCI)

Media Rights Auction
Saurabh Walkar : रोहितचं टेन्शन वाढवणार सौरभ वालकर! वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड घेणार मराठमोळ्या अ‍ॅनलिस्टची मदत

बीसीसीआयने असे अचानक आपल्या धोरणात का बदल केला हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. मात्र या धोरण बदलामुळे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि झी नेटवर्क यांना नक्कीच फायदा मिळण्याची शक्यता आहे. ते सध्या विलिनीकरण्याच्या वाटाघाटी करत आहेत. व्यावसायिक व्याखेत सांगायचं झालं तर नियमातील या बदलामुळे दोन माध्यम कंपण्याना एकत्र येत एक आघाडी तयार करून लिलावात सहभागी होता येणार आहे.

हा धोरणात्मक निर्णय हा खूप प्लॅन करून घेतल्याचे प्रथमदर्शी दिसते. सोनी आणि झी एकत्र आले तर ती एक मजबूत कॉर्पोरेशन होऊ शकते. याचा माध्यम हक्क लिलावात किंमत वाढवण्यात मोठा हातभार लागू शकतो. या दोन्ही माध्यम कंपन्यांचा टीव्ही आणि डीजिटल क्षेत्रात मोठा दबदबा आहे. यामुळे व्हायकॉम 18 आणि डिज्ने स्टारसाठी मोठी टक्कर निर्माण होईल.

Media Rights Auction
Gukesh D Chess Player : अवघ्या 17 वर्षाच्या गुकेशने विश्वनाथान आनंदलाही टाकलं मागं

गेल्या काही वर्षापासून सोनी आणि झीच्या विलिनीकरणावर सर्वांचेच लक्ष आहे. मात्र काही कायदेशी बाबींमुळे या विलिनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब होत नाहीये. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण 1 ऑक्टोबरपर्यंत होईल. ते बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार टेंडर भरणार की नाही हे माहिती नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.