Winter Olympics 2022: भारताचा एकमेव खेळाडू मोहम्मद आरिफ खान कोण आहे?

Mohammad Arif Khan the only player to represent India in Beijing winter Olympics
Mohammad Arif Khan the only player to represent India in Beijing winter Olympics ESAKAL
Updated on

नवी दिल्ली : ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकनंतर आता सारं जग हिवाळी ऑलिम्पिकसाठी तयारीला लागलं आहे. इतर ऑलिम्पिक स्पर्धांसारखी भारतात या स्पर्धेची फारशी चर्चा होत नसली तरी भारताचा एकमेव खेळाडू (Mohammad Arif Khan) यंदाच्या स्पर्धेत पात्र ठरणार पहिला आणि एकमेव भारतीय बनला आहे. (Mohammad Arif Khan The Only Player to Represent India In Beijing Winter Olympics)

2020 टोकियो ऑलिम्पिकच्या समारोपाच्या अवघ्या सहा महिन्यांनी 4 फेब्रुवारी म्हणजे उद्या हिवाळी ऑलिम्पिकचा (Beijing 2022) उद्घाटन सोहळा होणार आहे. या स्पर्धेत भारताकडून मोहम्मद आरिफ खानच्या (Mohammad Arif Khan) रूपाने या हिवाळी खेळांसाठी स्थान मिळवणारा देशातील पहिला आणि एकमेव खेळाडू बनला आहे.

Mohammad Arif Khan the only player to represent India in Beijing winter Olympics
IPL Mega Auction: U19 वर्ल्डकपमधील कोणता खेळाडू घेणार कोटीच्या कोटी उड्डाणे?

कोण आहे मोहम्मद आरिफ खान ?

मूळचा काश्मीरचा असणारा मोहम्मद आरिफ खान हा अल्पाइन स्कीअर (Alpine Skier) आहे. त्याचे वडील यासीन खान यांचे गुलमर्ग येथे स्की उपकरणांचे दुकान होते आणि तिथूनच आरिफचे या खेळावरील प्रेम वाढले. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने पहिल्यांदा स्कीइंग केले. जेव्हा तो 10 वर्षांचा झाला तेव्हा तो स्पर्धात्मक स्कीइंगकडे वळला आणि हळूहळू यशाची शिखरे गाठू लागला, वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी, मोहम्मदने स्लॅलममध्ये आपल्या पहिल्याच राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

योमासे, जपान येथील ज्युनियर इंटरनॅशनल स्की फेडरेशन (FIS) स्पर्धेत वयाच्या 16 व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना, तो जायंट स्लॅलममध्ये 23 व्या स्थानावर होता. 2011 मध्ये त्याने दक्षिण आशियाई हिवाळी खेळांमध्ये - स्लॅलम आणि जायंट स्लॅलममध्ये - दोन सुवर्णपदके जिंकली.

2013 मध्ये त्याने FIS वर्ल्ड स्की चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला होता आणि या स्लॅलममध्ये 59 वे आणि जायंट स्लॅलममध्ये 91 वे स्थान मिळवले होते. मात्र, तो पात्रता फेरी पार करू शकला नाही. त्यानंतर त्याने मॉन्टेनेग्रोमधील एका संमेलनात जायंट स्लॅलममध्ये आपली ऑलिम्पिकमधील तिकीट बुक केली होती.

Mohammad Arif Khan the only player to represent India in Beijing winter Olympics
'जर कोरोना रूग्णसंख्या वाढली नाही तरच आयपीएल...'

अल्पाइन स्कीइंग म्हणजे काय?

अल्पाइन स्कीइंग ज्याला डाउनहिल स्कीइंग देखील म्हटले जाते जेव्हा एक खेळाडू बर्फाच्छादित उतारांवरून स्कीवर सरकतो. इतर प्रकारच्या स्कीइंगच्या विपरीत, हा खेळ फ्री-हिल बाइंडिंगसह स्की वापरतो. हिवाळी ऑलिंपिकमध्ये अल्पाइन स्कीइंग प्रकारात याआधी 1964, 1968, 1988, 1992, 2006, 2010 आणि 2014 साली खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

यंदाची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा (Winter Olympics) चीनच्या राजधानी बीजिंगमध्ये होणार असून या स्पर्धेला बीजिंग 2022 असं नाव देण्यात आलं आहे. ज्यामुळे ऑलिम्पिकच्या उन्हाळी आणि हिवाळी दोन्ही आवृत्त्यांचे आयोजन करणारे चीनची राजधानी हे पहिले शहर बनले आहे (बीजिंगने यापूर्वी 2008 मध्ये ऑलिम्पिक उन्हाळी खेळांचे आयोजन केले होते).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()