Meg Lanning World Record Women's T20 World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. कांगारूंनी यजमान दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकपची फायनल जिंकली. ऑस्ट्रेलियन महिला संघाने टी 20 वर्ल्डकप विजेचेपदाची हॅट्ट्रिक साधत आपला विजयी षटकार देखील पूर्ण केला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने तब्बल सहाव्यांदा टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरले.
याचबरोबर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने देखील एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. मेग लेनिंगने आपली पाचवी आयसीसी ट्रॉफी जिंकली. याचबरोबर तिने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगचा सर्वाधिक 4 वर्ल्डकप जिंकण्याचा विश्वविक्रम मोडला. तिने महेंद्रसिंह धोनी आणि पॉटिंगच्या प्रत्येकी तीन आयसीसी ट्रॉफींचा विक्रमही मोडला होता. लेनिंगने या दोन दिग्गज कर्णधारांना मागे टाकले.
ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014, 2018, 2022, 2023 असे सहा महिला टी 20 वर्ल्डकप आपल्या नावावर केले आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग आणि एलिसा हेली या 10 टी 20 आंतरराष्ट्रीय फायनल खेळणाऱ्या पहिल्या खेळाडू देखील बनल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात बेथ मूनीने 53 चेंडूत नाबाद 74 धावांची दमदार खेळी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 156 धावा ठोकल्या. मूनीने पहिल्या विकेटसाठी 36 तर अॅश्ले गार्डनर (29) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. बेथ मूनी सामनावीराची मानकरी ठरली तर ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 110 धावा करत 10 विकेट्सही घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.