World Cup 2023 : मेटा अन् आयसीसीची भागीदारी; 500 पेक्षा जास्त क्रिएटर हलवणार पडद्यामागून सूत्रं

World Cup 2023
World Cup 2023esakal
Updated on

World Cup 2023 : सोशल मीडिया जायंट्स मेटाने आयसीसीसोबत भागीदारी केल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. यंदाच्या वनडे वर्ल्डकपचे कव्हरेज वाढवण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. ही आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेची आतापर्यंतचे सर्वात मोठे क्रिएटर कॅम्पेन असणार आहे. यामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त क्रिएटर सहभागी असणार आहेत.

World Cup 2023
India vs Pakistan: "नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​धोका, आमच्या टीमला सुरक्षा द्या"; पाक सरकारची भारताकडे मागणी

मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील कंपनीने सुपर 50 ग्रुपची निवड केली आहे. ते पडद्यामागील सर्व घडामोडी क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवणार आहेत.

अधिकृत प्रेस रिलीजनुसार या सुपर क्रिएटर्सना यापूर्वी कधीही मिळाला नाही असा मॅच अॅक्सेस मिळणार आहे. ते प्री आणि पोस्ट मॅच कार्यक्रमात मैदानावर असतील. हे क्रिएटर्स भारतभरातून निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यावेळी हे क्रिएटर्स त्यांच्या शहरातील मैदानावर उपस्थित राहून त्यांच्या भाषेत कंटेट क्रिएट करणार आहेत.'

World Cup 2023
World Cup 2023 Team India : टीम इंडियाची जर्सी झाली भगवी... विराट अन् रोहितचा फोटो होतोय व्हायरल

सुपर 50 क्रिएटर्सशिवाय अजून काही क्रिएटर्स सामन्यावेळी उरस्थित असतील आणि ते त्यांचा प्रेक्षकांसोबतचा अनुभव सर्वांशी शेअर करतील.

मेटाने सांगितले की, 'जे सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव असेल. या स्थानिक क्रिएटर्सचे अनुभव हे रील्स, व्हॉट्स अॅप चॅनल्स, इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल आणि थ्रेडमार्फत शेअर केला जाईल.'

(World Cup 2023 Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.