VIDEO: टेनिस कोर्टवर राडा; अलेक्झांडरने रॅकेट तुटेपर्यंत अंपायरवर काढला राग

Mexican Open Alexander Zverev Assault with Tennis Racket on Umpires Chair
Mexican Open Alexander Zverev Assault with Tennis Racket on Umpires Chair ESAKAL
Updated on

मॅक्सिकन ओपन (Mexican Open) टेनिस (Tennis) स्पर्धेत कोर्टवर राडा झाला. पुरूष दुहेरीचा सामना गमावल्यानंतर अलेक्झांडर झेवेरेव्हने (Alexander Zverev) आपला सगळा राग अंपायरच्या खुर्चीवर काढला. याचबरोबर त्याने अंपायरना शिवीगाळ देखील केली. या कृत्याची गंभीर दखल घेत जर्मनीच्या अलेक्झांडरला मॅक्सिकन ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Mexican Open Alexander Zverev Assault with Tennis Racket on Umpires Chair
IPL 2022: नव्या दिल्लीला मुंबईचे आकर्षण; आमरेंबरोबर आता आगरकरही

मॅक्सिकन ओपनमध्ये अलेक्झांडर त्याच्या ब्राझीलच्या पार्टनर मार्केलो मेलोबरोबर पुरूष दुहेरीच्या सामन्यात (Mens Doubles) उतरला होता. त्यांचा सामना लॉईड ग्लासपूल आणि हॅरी हेलीओव्हारा या जोडीबरोबर होता. मात्र अलेक्झांडर आणि मार्केलो यांनी हा सामना 6-2, 4-6(10-6) असा गमावला. सामना गमावल्यानंतर अलेक्झांडरने विरोधी खेळाडूंशी हस्तांदोलन केले. मात्र त्यानंतर अलेक्झांडरने आपल्या टेनिस रॅकेटने (Tennis Racket) अंपायर बसलेल्या खुर्चीवर आघात करण्यास सुरूवात केली. त्याने अनेक आघात केले. तो अंपायवर सातत्याने ओरडत होता. अखेर अंपायर खुर्चीवरून उठून गेले. मात्र अलेक्झांडरने पुन्हा अंपायरच्या खुर्चीवर रॅकेट मारली. यामुळे अलेक्झांडरची रॅकेट मोडली.

Mexican Open Alexander Zverev Assault with Tennis Racket on Umpires Chair
कॅप्टन रोहित म्हणतो माझ्या जागेवर आहे तिघांची दावेदारी!

अलेक्झांडर हा टायब्रेकमध्ये अंपायरने दिलेल्या निर्णयावर चिडून होता. रागाच्या भरातच या जर्मन टेनिसपटूने अंपायरला शिवीगाळ देखील केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()