जपानची राजधानी टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडत टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरलीये. नारी शक्तीची ताकद आणि दृढनिश्चयाची चुणूक दाखवून देणाऱ्या भाविना पटेल हिला ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने खास बक्षीस देत सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. एमजी मोटर इंडियाकडून तिला कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही भेट देण्यात येणार आहे.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्विटच्या माध्यमातून भाविनाच्या अभिनंदन केले आहे. "विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल." असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय.
भारतात प्रवेश केल्यापासून ते हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केरण्यापासूनच्या प्रवासात एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात 'दिव्यांग रन' नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे.
एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल. ऑटोमोटिव्ह ब्रँड असल्याने एमजीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले नाही तर समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.