WPL 2023: मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार! 1 सिक्स 9 फोर अन्... कर्णधार हरमनप्रीतची वादळी खेळी

मुंबई इंडियन्स संघाची विजयी मालिका कायम
  MI vs UPW WPL 2023 Harmanpreet Kaur, Nat Sciver-Brunt fire Mumbai Indians to fourth straight win cricket news in marathi
MI vs UPW WPL 2023 Harmanpreet Kaur, Nat Sciver-Brunt fire Mumbai Indians to fourth straight win cricket news in marathi
Updated on

WPL 2023 Mumbai Indians : साईका इशाक व अमेलिया कीर यांची प्रभावी गोलंदाजी आणि हरमनप्रीत कौर, नॅट सीव्हर ब्रंट, यास्तिका भाटीया यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी मुंबईत झालेल्या महिला प्रीमियर लीगमधील लढतीत यूपी वॉरियर्स संघावर आठ विकेट व १५ चेंडू राखून विजय मिळवला. या दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्सने या स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखली. हा त्यांचा सलग चौथा विजय ठरला हे विशेष.

  MI vs UPW WPL 2023 Harmanpreet Kaur, Nat Sciver-Brunt fire Mumbai Indians to fourth straight win cricket news in marathi
WTC Final: अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये?

यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्ससमोर १६० धावांचे आव्हान उभे ठाकले. हिली मॅथ्यूज व यास्तिका भाटीया या जोडीने ५८ धावांची भागीदारी रचली. राजेश्वरी गायकवाड हिने यास्तिकाला ४२ धावांवर, तर

सोफी एक्लेस्टोन हिने मॅथ्यूजला १२ धावांवर बाद केले; पण नॅट सिव्हर व हरमनप्रीत कौर या दिग्गज खेळाडूंनी अधिक पडझड होऊ दिली नाही. दोघींनी नाबाद १०६ धावांची भागीदारी करताना वर्चस्व गाजवले. सिव्हर हिने ३१ चेंडूंमध्ये ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४५ धावांची, तर हरमनप्रीतने ३३ चेंडूंमध्ये ९ चौकार व १ षटकारासह नाबाद ५३ धावांची खेळी करीत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

  MI vs UPW WPL 2023 Harmanpreet Kaur, Nat Sciver-Brunt fire Mumbai Indians to fourth straight win cricket news in marathi
Eng vs Ban T20I : बांगलादेशने रचला इतिहास! विश्वविजेत्या इंग्लंडला प्रथमच चारली पराभवाची धूळ अन्...

संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स २० षटकांत ६ बाद १५९ धावा (एलिसा हिली ५८, साईका इशाक ३/३३) पराभूत वि. मुंबई इंडियन्स १७.३ षटकांत २ बाद १६४ धावा (नॅट सिव्हर नाबाद ४५, हरमनप्रीत कौर नाबाद ५३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.