Michael Vaughan : रोहितनं डीजेसोबत आधीच सेटिंग लावलं... 'दिल दिल पाकिस्तान'वरून वॉन काय म्हणाला?

Michael Vaughan
Michael Vaughanesakal
Updated on

Michael Vaughan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊन बरेच दिवस झाले. मात्र पाकिस्तानच्या या पराभवाची चर्चा अजूनही सुरू आहे. पाकिस्तानचे क्रिकेट संचालक आणि मुख्यi प्रशिक्षक माईक आर्थर यांनी पराभवानंतर एक अजब वक्तव्य केलं होतं. त्यांनी डीजेने एकदाही दिल दिल पाकिस्तान हे गाणं वाजवलं नाही अशी बालिश तक्रार केली.

आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आर्थर यांची चांगलीच खेचली. त्याने रोहित शर्माची स्तुती करत मिकी आर्थर यांना टोले हाणले. वॉन हा ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टशी बोलत होता. त्यावेळी त्याने भारतीय कर्णधाराची तोंडभरून स्तुती केली.

Michael Vaughan
IPL 2024 : लोकसभा निवडणूक असली तरी आयपीएल भारतातच होणार?

वॉन आर्थर यांच्या दिल दिल पाकिस्तान गाण्याच्या कमेंटवरून म्हणाला, 'रोहित शर्माने सर्वात चांगले पाऊल उचलले. त्याच्या या निर्णयामुळे भारताला पाकिस्तानविरूद्ध विजय मिळाला. रोहितने डीजेला सांगितले की दिल दिल पाकिस्तान गाणं वाजवू नकोस. तू जर गाणं वाजवलंस तर पाकिस्तान जिंकेल ते गाणं वाजवू नकोस.' रोहितची ही चलाखी होती. बरेच कर्णधार डीजे, संगीत या गोष्टींचा विचार करत नाहीत. मात्र रोहित काळाच्या पुढे आहे.

Michael Vaughan
Ind vs Nz : शशी थरूरांनी पांड्याची दिली भन्नाट रिप्लेसमेंट, क्रिकेट पंडितांनाही जमलं नसतं असं कॉम्बिनेशन

गिलख्रिस्टला हसू आवरेना

मायकल वॉन ज्यावेळी पाकिस्तानी कोच आर्थर यांना टोमणे मारत होता त्यावेळी गिलख्रिस्टला आपलं हसू आवरलं नाही. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तान एकवेळ 2 बाद 155 धावांवर खेळत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत त्यांना 191 धावात गुंडाळले.

यानंतर रोहित शर्माच्या धडाकेबाज सलामीमुळे भारताने जवळपास 20 षटके राखून हे आव्हान पार केले. मात्र मिकी आर्थर यांनी पाकिस्तानच्या पराभवाचं एक कारण हे डीजेने दिल दिल पाकिस्तान गाणं न वाजवणं हे असल्याचं वक्तव्य केलं होतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.