World Cup 2023 : वर्ल्डकप नाही द्विपक्षीय मालिका... आर्थर यांच्या वक्तव्याची आयसीसीने घेतली दखल

Mickey Arthur criticism India vs Pakistan World Cup 2023 clash ICC will review...
World Cup 2023
World Cup 2023esakal
Updated on

World Cup 2023 IND vs PAK : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक लक्षवेधी सामना अपेक्षेप्रमाणे भारत - पाकिस्तानच ठरला. वर्ल्डकप भारतात असल्याने ते सहाजिकच होतं. बीसीसीआय आणि आयसीसीने देखील याच सामन्याची जय्यत तयारी केली. पाकिस्तान संघाचे संचालक माईक आर्थर यांनी देखील भारत - पाकिस्तान सामन्यानंतर यावर टीका केली होती.

World Cup 2023
World Cup 2023 Team India : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा 'हुकमी एक्का'च ठरू शकतो 'दुखरी नस'

नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. त्यावर भारत - पाकिस्तान सामना झाला अन् 1.3 लाख क्षमतेच्या स्टेडियममध्ये एकही पाकिस्तानी क्रिकेट चाहता दिसला नाही. यावरून माईक आर्थर यांनी टीका केली होती. पाकिस्तानच्या संघाला समर्थन करणारा मैदानावर एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता. फक्त काही थोड्याच पाकिस्तीनी पत्रकारांना वर्ल्डकपसाठी व्हिसा मिळाला आहे.

'एकही चाहता मैदानात नसण्याचा आमच्यावर कोणताही परिणाम झाला नाही असं म्हणणं खोटेपणाचं होईल. हा काही आयसीसीचा इव्हेंट वाटत नाहीये. खरं सांगू का ही एक द्विपक्षीय मालिका वाटते आहे. हा बीसीसीआयचा इव्हेंट वाटतो आहे.'

भारत - पाकिस्तान सामन्यावेळी चाहत्यांची एकतर्फी उपस्थितीवरून आर्थर यांनी नाराजी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवर निळा समुद्रच अवतरला होता.

World Cup 2023
World Cup 2023 Semi Final : उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला जिंकावे लागतील 'हे' सामने, जाणून घ्या समीकरण

दरम्यान, माईक आर्थर यांच्या वक्तव्यानंतर आयसीसीचे प्रमुख ग्रेग बार्क्ले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आम्ही कोणतीही स्पर्धा आयोजित केली तरी त्याच्यावर कोणती ना कोणती टीका होत असतेच. महत्वाचं म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. ही स्पर्धेची फक्त सुरूवात आहे. संपूर्ण स्पर्धा झाल्यावर परिस्थिती कशी असते हे पाहू आणि जर गरज असेल तर आम्ही वर्ल्डकप आयोजनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का, ही सुधारणा कशी करता येईल हे पाहू.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.