Video: श्रीलंकेचा 'मिनी मलिंगा' सज्ज होतोय

Matheesha Pathirana a Mini Malinga is Coming ICC Share Video
Matheesha Pathirana a Mini Malinga is Coming ICC Share Videoesakal
Updated on

श्रीलंकेचा दिग्गत वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन गोलंदाजीत (Sri Lankan Bowling) एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र आता ही पोकळी भरून काढण्यासाठी मिनी मलिंगा सज्ज होत आहे. (Mini Malinga is Coming ICC Share Video of Matheesha Pathirana)

Matheesha Pathirana a Mini Malinga is Coming ICC Share Video
हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?

सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकप सुरू आहे. या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या एका गोलंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या गोलंदाजाचे नाव आहे मथीशा पतिराना (Matheesha Pathirana). १९ वर्षाखालील श्रीलंकेच्या संघाकडून खेळणाऱ्या मथीशा पतिरानाची बॉलिंग अॅक्शन हुबेहूब लसिथ मलिंगा सारखी आहे. पतिराना देखील साईड आर्म (Slinging Bowling Action) गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचा चेंडू फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मथीशा पतिरानाचा (Matheesha Pathirana) एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Matheesha Pathirana a Mini Malinga is Coming ICC Share Video
शोएब अख्तर म्हणतो, 'मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा...'

मथीशा पतिराना भारताविरूद्धच्या गेल्या वर्षी १९ वर्षाखालील सामन्यात पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्याने यशस्वी जौसवालला (Yashasvi Jaiswal) १७५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. हा शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) २००३ च्या वर्ल्डकपमध्ये १६१.३ किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या सगळ्याच वेगवान चेंडूपेक्षाही जास्त वेगाने टाकलेला चेंडू होता. मात्र हा चेंडू वाईड असल्याने त्याची सर्वात वेगावान चेंडू (fastest ball) म्हणून नोंद झाली नव्हती. यानंतर पतिरानाचा चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) राखीव खेळाडूंमध्येही समावेश झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.