क्रीडा मंत्री झाले रोमँटिक, झळकावले 'प्रेम पत्र'

मनोज तिवारीने क्रिकेटच्या मैदानातूनच आपल्या पत्नीवरच प्रेम केले व्यक्त...
minister manoj tiwary century and sends lovely message to wife
minister manoj tiwary century and sends lovely message to wife
Updated on

Ranji Trophy 2022: रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीत बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मध्य प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने शानदार शतक झळकवले आहे. याआधी उपांत्यपूर्व फेरीत त्याने झारखंडविरुद्ध पहिल्या डावात 73 आणि दुसऱ्या डावात 136 धावा केल्या होत्या.

उपांत्य फेरीत तो 211 चेंडूत 102 धावा करून बाद झाला, हे त्याचे 29 वे प्रथम श्रेणी शतक होते. मनोज तिवारीच्या शतकाच्या जोरावर बंगालला मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळ जाण्यात यश आले आहे. सामन्यादरम्यान त्याने क्रिकेटच्या मैदानातूनच आपल्या पत्नीवरच प्रेम व्यक्त केले. (Minister Manoj Tiwary Century And Sends Lovely Message To Wife)

minister manoj tiwary century and sends lovely message to wife
राहुल तेवतियाचे ट्विट रातोरात व्हायरल; टीम इंडियातून वगळल्याने दोन शब्दांत व्यथा

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्याने आपल्या घरच्या संघ बंगालचे नेतृत्व करताना सलग दुसरे शतक झळकावले. या दमदार शतकानंतर त्याने जे केले त्याने सर्वांची मने जिंकली आहे. शतक झाल्यानंतर त्याने एक कागद काढला, ज्यामध्ये त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींची नावे होती. सर्वप्रथम पत्नीचे नाव सुष्मिता आहे. मनोज तिवारीचे त्याच्या कुटुंबावर किती प्रेम करतात हे दिसून येते. त्याला एक मोठा मुलगा आहे.

minister manoj tiwary century and sends lovely message to wife
IPL च्या प्रगतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला लागली मिर्ची

मध्य प्रदेशविरुद्ध दुसऱ्या दिवशी 84 धावांवर नाबाद परतलेला मनोज तिवारी त्याने सलग दुसरे शतक पुर्ण केले, तो आज 102 धावा करून बाद झाला. शाहबाज अहमदसोबत सहाव्या विकेटसाठी त्याने 183 धावांची विक्रमी भागीदारी केली. शाहबाजने पण आयपीएलमध्ये शतक झळकावले होते. मनोज तिवारीबद्दल बोलायचे झाले तर, 54/5 च्या स्कोअरसह बंगालला 341 धावांपर्यंत नेण्यात दोघांनी मोठी भूमिका बजावली. गेल्या आठवड्यातही तिवारीने उपांत्यपूर्व फेरीत 74 आणि 136 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.