सिंगापूर: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सिंगापूर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Singapore Weightlifting International) सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली. याचबरोबर चानूने 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल (Commonwealth Games 2022) स्पर्धेसाठी पात्र देखील झाली आहे. मीराबाई चानू 55 किलो वजनी गटात पहिल्यादाच भाग घेत आहे. (Mirabai Chanu qualified for Commonwealth Games 2022)
चानूने एकूण 191 किलो (86+105) वजन उचलत 55 किलो वजनीगटात अव्वल स्थान पटकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाची जेसिका स्वेस्टेंनको दुसऱ्या स्थानवर राहिली. तिने एकूण 167 किलो (77+90) वजन उचलले. मीराबाई चानूने तिच्यापेक्षा 24 किलो जास्त वजन उचलले. मलेशियाची कासेंद्रा एग्लेबर्ट तिसऱ्या स्थानावर राहिली. तिने एकूण 165 (75+90) किलो वजन उचलले.
मीराबाई चानूने डिसेंबर महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) गेल्या वर्षी वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे पहिले रौप्य पदक पटकावल्यानंतर चानू थेच सिंगापूर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरली. चानू राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 49 किलो वजनी गटात देखील पात्र झाली आहे. असे असले तरी भारत राष्ट्रकुल स्पर्धेत जास्तीजास्त सुवर्ण पदके जिंकण्यासाठी चानूला 55 किलो वजनी गटात देखील उतरवण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.