Mitchell Marsh World Cup Trophy : एवढं काय त्यात... ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मार्शची आली पहिली प्रतिक्रिया

Mitchell Marsh Reaction On World Cup Trophy Controversy
Mitchell Marsh Reaction On World Cup Trophy Controversy
Updated on

Mitchell Marsh Reaction On World Cup Trophy Controversy : ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप सहाव्यांदा जिंकल्यानंतर त्यांच्या संघाने ड्रेसिंग रूममध्ये आणि हॉटेलमध्ये मोठा जल्लोष केला होता. त्यावेळी मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो देखील व्हायरल झाला होता. यावरून क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या वादावर आता मिशेल मार्शने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Mitchell Marsh Reaction On World Cup Trophy Controversy
IND vs AUS 4th T20I : रायपूरमध्ये युवा संघाने विश्वविजेत्यांना लोळवत मालिकेवर केला कब्जा

मिशेल मार्शने SEN शी बोलताना सांगितले, 'या फोटोत कोणाताही अनादर करण्याचा हेतू नक्कीच नव्हता. मी या गोष्टीवर फार काही बोलणार नाही. जरी लोकांनी तू ट्रोल होत आहे असं सांगितलं तरी मी सोशल मीडिया फार पाहिला नाही. याला एवढं महत्व देण्यासारखं काही नाही.'

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला तरी सोशल मीडियाव मार्शचं ट्रॉफीवर पाय टाकून बसणं ट्विटरवर ट्रेंड होत होतं. मोहम्मद शमीने देखील या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली होती.

Mitchell Marsh Reaction On World Cup Trophy Controversy
IND vs AUS 4th T20I : रायपूर स्टेडियमची बत्ती गुल! भारत - ऑस्ट्रेलिया चौथा सामना होण्याऱ्या स्टेडियमचा वीजपुरवठा आहे बंद

सोशल मीडियावर एका व्यक्तीशी संवाद साधताना शमी म्हणाला की, 'ही गोष्ट मला देखील खूप वेदना देऊन गेली. सर्व देश या ट्रॉफीसाठीत लढत होते. सर्वजण ही ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्न करत होते. मार्शने त्या ट्रॉफीवर पाय टाकूण बसणे मला आवडलं नाही. त्यानं असं करायला नको होतं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.