IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाने केली कॉपी; पहिल्या वनडेत भारताचीच रणनिती अवलंबणार

IND vs AUS 1st ODI
IND vs AUS 1st ODI esakal
Updated on

IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना उद्या (दि. 22 ) मोहालीत खेळवण्यात येणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्डकपच्या तोंडावर प्रमुख खेळाडूंना पुरेशी विश्रांती आणि दुखापतग्रस्त होण्यापासून रोखण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे.

याच निर्णयाची कॉपी ऑस्ट्रेलियन संघाने देखील घेतली आहे. भारताविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मुख्य वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हे खेळणार नाहीयेत. कर्णधार पॅट कमिन्सने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

IND vs AUS 1st ODI
IND vs AUS India Playing 11 : तब्बल 21 महिन्यांनी अश्विन वनडे संघात परतणार; ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी असणार प्लेईंग 11

कमिन्सने पहिल्या वनडेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मिचेल स्टार्क भारतात आला आहे. मात्र तो उद्याचा सामना खेळणार नाही. मात्र आशा आहे की तो मालिकेतील पुढच्या सामन्यांसाठी उपलब्ध असेल. ग्लेन मॅक्सवेलबाबतही तेच आहे.'

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्याला डाव्या हाताच्या मनगटाला झालेल्या सौम्य दुखापतीमुळे मुकला होता. तो भारताविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात संघात परतणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी शेअर केलेल्या व्हिडिओत स्मिथ नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला होता. त्याने नेटमध्ये दोन तास घाम गाळला.

IND vs AUS 1st ODI
ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेची धडाडणारी तोफ झाली निकामी; 465 विकेट्स घेणार गोलंदाज वर्ल्डकपला मुकला

मिळालेल्या माहितीनुसार स्टार्कचा मांडीचा स्नायू ताणला आहे. त्याला ही दुखापत WTC Final दरम्यान झाली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.