Mitchell Starc : फायनल नव्या की जुन्या खेळपट्टीवर... सामन्यापूर्वीच स्टार्कने पराभवचं खापर फोडण्यासाठी कारण शोधलं?

Mitchell Starc IND vs AUS Final
Mitchell Starc IND vs AUS Finalesakal
Updated on

Mitchell Starc IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे 19 नोव्हेंबरला विश्वविजेत्याचा मुकूट मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहे. भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली तर ऑस्ट्रेलियाने रडत खडत का असेना दक्षिण अफ्रिकेचा 3 विकेट्सनी पराभव करत अहमदाबादचं तिकीट निश्चित केलं.

रविवारी क्रिकेट जगतातील दोन दिग्गज संघ जगतील सर्वात मोठ्या स्टेडियमवर एकमेकांना भिडणार आहेत. अशा परिस्थितीत अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत चर्चा होणार नाही असं कसं? ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Mitchell Starc IND vs AUS Final
वर्ल्डकप फायनलसाठी भारतीय हवाई दलही लागलं कामाला, सूर्य किरण टीमवर खास जबाबदारी

भारतीय संघाने यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतचे 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. काल ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत नवव्यांदा वनडे वर्ल्डकपची फायनल गाठली. सामन्यानंतर स्टार्क म्हणाला, 'आम्ही सर्वोकृष्ट संघाचा सामना करू इच्छितो. आतापर्यंत भारत स्पर्धेतील सर्वोत्तम संघ राहिला आहे. आता आम्ही दोघं फायनलमध्ये आमने सामने येणार आहोत. हा वर्ल्डकप आहे आणि आम्ही यासाठीत क्रिकेट खेळतो.'

तो पुढे म्हणाला की, 'आम्हा सामना निश्चित त्या संघासोबत आहे जो संघ कोणत्याही आव्हानाचा सामना पुढे सरसावून करतो. ते आतापर्यंत अजेय राहिले आहेत.' भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लीग स्टेजचा पहिला सामना झाला होता. मात्र हा सामना एकतर्फी झाला होता.

'चेन्नईत झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 199 धावांवर सर्व संघ गारद केला. त्यानंतर 6 विकेट्सनी सामना जिंकला होता.'

स्टार्क म्हणाला की, 'आम्ही स्पर्धेच्या सुरूवातीचा सामना भारतासोबत खेळलो होतो. आता शेवटचा सामनाही त्यांच्या सोबत खेळतोय. शेवटी स्थिती काय होते हे पहावे लागेल.'

Mitchell Starc IND vs AUS Final
Shahid Afridi : काय सांगाता सासरेबुवांनाच जावई 'कर्णधार' झालेला नकोय; शाहीद अफ्रिदी म्हणतो मी सांगितलं होत...

दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फिरकीचा सामना करताना फार अडचणी आल्या होत्या. स्टार्कला अहमदाबादमधील खेळपट्टी कशी असेल यााबबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, 'आम्ही उद्या अहमदाबादमध्ये पोहचलो की खेळपट्टीबाबत आम्हाला माहिती होईल. सामना नव्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे की जुन्या खेळपट्टीवर सामना खेळला जाईल ते स्पष्ट होईल.'

2003 च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी स्टार्क हा 13 वर्षाचा होता. याबाबत तो म्हणाला की, 'मी त्या सामन्याबद्दल इतकंच जाणतो की ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला होता. त्या व्यतिरिक्त त्या सामन्यात काय झालं होतं हे मला नाही माहिती.'

स्टार्क म्हणला, 'दोन्ही संघांना एकमेकांची ताकद आणि कच्चे दुवे माहिती आहेत. आम्ही नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 लाख 30 हजार प्रेक्षकांसमोर भारताचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. दोन्ही संघ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तेथे खेळले आहेत. दोन्ही संघांनी या वर्षाच्या सुरूवातीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एकमेकांचा सामना केला आहे. दोन्ही संघांना मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.