दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे. तसेच तिचा 'शाबास मितू' हा बायोपिक देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, तिला तिच्या पुढील भविष्याबाबत विचारणा झाल्यावर तिने महिला आयपीएलचा (Women's IPL) पर्याय अजून खुला असल्याचे सांगितले. याचबरोबर मिताली राजने भारतीय संघातील सर्वात युवा खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मावर (Shafali Verma) स्तुतीसुमने उधळली आहेत. मिताली राजने मी शेफालीची फॅन असल्याचे सांगितले.
मिताली राज आयसीसी 100 पर्सेंट क्रिकेट पॉडकास्ट या कार्यक्रमात बोलताना म्हणाली, 'मी तिच्या खेळाची खूप मोठी फॅन आहे. मला वाटते की तिच्याकडे एकहाती सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. ती एक अशी खेळाडू आहे की ती कोणत्याही संघाविरूद्ध धडाकेबाज फलंदाजी करू शकते. अशी खेळाडू पिढीत एखादीच होते.'
मिताली पुढे म्हणाली, 'मी ज्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेफालीला पाहिले त्यावेळी तिने इंडियन रेल्वेविरूद्ध अर्धशतक केले होते. त्याचवेळी तिने एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले होते. ती माझ्या व्हिलॉसिटीकडून पहिला हंगाम खेळली. त्यावेळी तिच्याकडे रॉ पॉवर असल्याचे दिसून आले. ती कधीही षटकार मारू शकते.'
मिताली राज महिला आयपीएल बाबत बोलताना म्हणाली की, 'मी माझे पर्याय खुले ठेवले आहेत. मी अजून काही ठरवलेलं नाही. महिला आयपीएल सुरू होण्यास अजून काही महिने आहेत. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा भाग होणे आवडेल.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.