मितालीनं चार चौघींवर फोडलं पराभवाचं खापर

 England Women vs India Women
England Women vs India WomenSakal
Updated on

Womens World Cup 2022 England Women vs India Women, 15th Match : न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. गत वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडच्या संघासमोर भारतीय बॅटरचा निभावच लागला नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 134 धावांत आटोपला होता. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय महिला संघाने 28 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या.

भारतीय संघाला (India Women)अल्प धावसंख्येत आटोपून इंग्लंड महिलांनी (England Women) तीन पराभवानंतर पहिल्या विजयाची नोंद केली. 18 ओव्हर आणि 4 विकेट्स राखून इंग्लंड संघाने सामना सहज खिशात घातला. इंग्लंडकडून कॅप्टन हिथर नाइट आणि नेटली साइव्हर या दोघींनी संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला. हिथर नाईट हिने नाबाद 53 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला साइव्हर हिने 45 धावांची खेळी साकारली.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने पराभवाचे खापर हे आघाडीच्या बॅटरच्या फ्लॉप शोवर फोडले आहे. इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर मिताली म्हणाली की, आघाडीच्या बॅटरनी निराशजनक कामगिरी केली. जर धावसंख्या 200 पर्यंत नेली असती तर आम्ही सामना जिंकला असता, असे सांगत तिने सामना वाचवण्यासाठी गोलंदाजांना स्कोपच नव्हता, असेही सांगितले.

 England Women vs India Women
PAK vs AUS : ऑस्ट्रेलियन कॅप्टनमध्ये दिसली 'थॉर'ची झलक

आघाडीच्या फळीत बिघाडीवर काय म्हणाली मिताली,...

सामन्यानंतर मिताली म्हणाली की, आमच्या आघाडीच्या बॅटरमध्ये म्हणावी तशी भागीदारी झाली नाही. टॉस गमावल्यानंतर आम्हाला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. भारतीय संघ संधीच सोन करण्यात कमी पडला. 200 धावा केल्या असत्या तर पराभवाचा सामना करावाच लागला नसता. आम्ही इंग्लंडला रोखू शकलो, असतो असे ती म्हणाली.

 England Women vs India Women
PAK vs AUS : 145 वर्षांत कुणाला जमलं नाही ते बाबरनं करुन दाखवलं

फिल्डिंगसंदर्भातील मितालीने भाष्य केले. आम्ही फिल्डिंगमध्ये उत्तम कामगिरी करत आहोत. पुढील सामन्यात हे सातत्य कायम राखून यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. सध्याच्या घडीला बॅटिंगवर अधिक फोकस करण्याची गरज आहे, अशा शब्दांत तिने आघाडीच्या चारचौघींवर पराभवाचे खापर फोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.