मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती; स्वप्न राहिले अधुरे

भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
mithali raj retirement international cricket women bcci tweet
mithali raj retirement international cricket women bcci tweet
Updated on

Mithali Raj Retirement International Cricket: भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज गेली 23 वर्षे क्रिकेट खेळत होती. बुधवारी वयाच्या 39 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केले आहे. महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

39 वर्षीय मिताली राजने 8 जून रोजी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. मिताली राजने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते आणि तसेच झाले. काही वर्षांपूर्वी त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

मिताली राजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पत्र शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे. मितालीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. कारण तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वोच्च सन्मान आहे. हा प्रवास सर्व प्रकारचे आनंदी क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.

मितालीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मितालीला शुभेच्छा दिल्या. “एक अद्भुत कारकीर्द संपुष्टात येते! मिताली राज, भारतीय क्रिकेटमधील तुमच्या अतुलनीय योगदानाबद्दल धन्यवाद. मैदानावरील तुमच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला संघाला गौरव प्राप्त झाला आहे. मैदानावरील या शानदार खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील डावासाठी शुभेच्छा!” असे शाह यांनी म्हटले आहे.

मिताली राजची कारकिर्द

मिताली राज ही महिला टीमची सर्वात यशस्वी क्रिकेटर होती. तिने १२ टेस्ट मॅचमध्ये ४३.६८ च्या सरासरीने ६९९ धावा केल्या आहेत. तिने टीम इंडियाकडून खेळताना २३२ वनडे सामने खेळले आहेत यादरम्यान तिने ७८०५ धावा केल्या आहेत. यामध्ये ६४ अर्धशतक आणि ७ शतकांचा समावेश आहे. तसेच टी २० मॅच फॉरमॅमध्ये तिच्या नावावर २३६४ धावा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.