मोहम्मद सालाह होणार निवृत्त; वर्ल्डकपसाठी अपात्र ठरल्यानंतर दिले संकेत?

Mohamed Salah hinted retirement
Mohamed Salah hinted retirementesakal
Updated on

कैरो : इजिप्तचा स्टार फुटबॉलर मोहम्मद सालाहने इजिप्तच्या राष्ट्रीय संघातील आपल्या भविष्याबाबत शंका उपस्थित केली आहे. त्याने इजिप्त वर्डकप क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यानंतर याबाबतचे संकेत दिले. त्याने आपल्या संघासोबत संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले.

Mohamed Salah hinted retirement
Video: सेनेगलचा रडीचा डाव; सालहच्या डोळ्यावर लेझरचा मारा

इजिप्तच्या युथ आणि स्पोर्ट्स मंत्रालयाने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलर मोहम्मद सालाहने या संघात असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले तसेच त्याने मी असेन किंवा नसेन असा शब्दप्रयोग वापरल्याने संभ्रम निर्माण झाला. स्पोर्ट्स मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत सालाह म्हणतो की, मी खेळाडूंना काल सांगितले होते की तुमच्याबरोबर खेळत असल्याचा मला अभिमान आहे. ते मी आतापर्यंत ज्या बेस्ट लोकांबरोबर खेळलो त्यात तुमचा देखील समावेश आहे. मला फार काही बोलायचं नाही पण, मी इथे असेन किंवा नसेन तुमच्याबरोबर खेळणे हा मी माझा सन्मान समजतो.'

Mohamed Salah hinted retirement
IPL 2022 : इंग्लंडच्या सॅम करनने बोलून दाखवली 'अस्वस्थता'

अनेक जाणकार मोहम्मद सालाहच्या वक्तव्याचा अर्थ तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार आहे असा काढत आहेत. 29 वर्षाच्या मोहम्मद सालाहने इजिप्तच्या संघाकडून 2011 पासून आपली कारकिर्द सुरू केली. त्याने 2017 च्या वर्ल्डकप क्वालिफाय सामन्यात अखेरच्या मिनिटाला कांगो विरूद्ध गोल करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मोहम्मद सालाहच्या या गोलमुळे इजिप्त 2018 च्या वर्ल्डकपमध्ये पात्र ठरला होता. मात्र मंगळवारी झालेल्या सेनेगल विरूद्धच्या वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात त्याला पेनाल्टी शूटआऊटमध्ये पेनाल्टी गोलपोस्टमध्ये दागण्यात अपयश आले. त्याचा फटका क्रॉसबारच्या वरून गेला होता. इजिप्तने सेनेगल विरूद्धचा पेनाल्टी शूटआऊटमधील सामना 3-1 ने गमावला त्यामुळे इजिप्तचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.