Mohammad Amir Playing IPL : पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला पुढच्या वर्षी ब्रिटीश पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेगवान गोलंदाज आमिरने ब्रिटीश नागरिक आणि पेशाने वकील असलेल्या नरजिस खानशी 2016 मध्येच लग्न केले आहे.
त्यानंतर आमिर 2020 मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाला होता. आता त्याला एका वर्षात ब्रिटीश पासपोर्ट मिळणार आहे.
क्रिकेट जगतातील सर्वात मोठी टी 20 लीग इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश नाहीये.
मात्र आमिरला आता ब्रिटीश पासपोर्ट मिळाला असल्याने त्याच्यासाठी आयपीएलचे दार उघडले जाऊ शकते. याबाबत मोहम्मद आमिरला प्रश्न विचारल्यानंतर आमिरने भन्नाट उत्तर दिले.
आमिर ARY न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'माझ्याकडे अजून एक वर्ष आहे. मला त्यावेळी काय परिस्थिती असले हे माहिती नाही. मी नेहमी एकावेळी एक पाऊल टाकतो. मी एका वर्षानंतर कुठं असेल हे मला माहिती नाही.'
'कोणालाही भविष्याबाबत काहीही माहिती नसतं. ज्यावेळी मला पासपोर्ट मिळेल त्यावेळी मी नक्कीच माझ्यासाठी चांगली संधी असेल तर मी ती नक्कीच सोडणार नाही.'
आयपीएलच्या 2008 च्या उद्घाटनाच्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. मात्र दोन्ही देशातील राजनैतिक संबंध बिघडल्यानंतर भारताने पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात खेळण्यावर बंदी घातली.'
'मोहम्मद आमिरची आयपीएल खेळण्याबाबत चर्चा सुरू असली तरी आमिरने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. तो म्हणाला की, 'मी इंग्लंडकडून खेळणार नाही. मला जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं होतं ते मी पाकिस्तानकडून खेळलं आहे.'
मोहम्मद आमिरने पुन्हा पाकिस्तानकडून खेळण्याबाबत उत्सुकता दर्शवली होती. आमिरने 2020 मध्ये संघ व्यवस्थापन चांगली वागणूक देत नाही असे सांगत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली होती.
दरम्यान, रमीझ राजा पीसीबी चेअरमन झाल्यानंतर मोहम्मद आमिर म्हणाला होता की 'जर अल्लहच्या मनात आलं तर मी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून खेळेन. मात्र मला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळायंच आहे आणि चांगली कामगिरी करायची आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.