मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला
पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र निवृत्तीनंतर त्याने लगेचच पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील (Pakistan cricket Board) माजी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्याने या माजी अधिकाऱ्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. (Mohammad Hafeez Criticize Former Pakistan cricket Board President)
निवृत्तीच्या घोषणेनंतर मोहम्मद हाफीजने लाहोरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने मॅच फिक्स (Match Fixing) करणाऱ्या खेळाडूंना संघात न घेण्याबद्दल बोर्डाकडे आग्रह धरला होता. त्यावेळी त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून वाईट प्रतिसाद मिळाला होता. हा अनुभव सांगताना मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) म्हणाला 'ज्यावेळी मी आणि अझर अलीने (Azahar Ali) मुल्य जपण्यासाठी मॅच फिक्स करणाऱ्या खेळाडूला संघात घेण्यास विरोध करण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्यावेळेच्या पीसीबीच्या अध्यक्षांनी जर तुम्ही खेळणार नसला तर मला काहीच अडचण नाही मात्र तो खेळाडू खेळणारच असे उत्तर दिले. माझ्या कारकिर्दित मला त्यावेळी सर्वाधिक निराशा आणि दुःख झाले होते.'
मोहम्मद हाफीजने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेतली होती. हाफीज जवळपास दोन दशके पाकिस्तानकडून (Pakistan) खेळला. त्याने 392 सामन्यात 12 हजार 789 धावा केल्या आहेत आणि 253 विकेट घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानकडून 55 कसोटी, 218 एकदिवसीय आणि 119 टी 20 सामने खेळले आहेत. हाफीजने 3 एकदिवसीय आणि 6 टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
मोहम्मद हाफीजला त्याच्या कारकिर्दित 32 वेळा समानावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचा पाकिस्तानकडून सर्वाधिकवेळा सामनावीराचा (Man Of The Match) पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये शाहीद आफ्रिदी ( 43 ) वासीम आक्रम (39) आणि इंझमाम - उल - हक यांच्यानंतर चौथा क्रमांक मोहम्मद हाफीजचा लागतो. त्याने 9 वेळा मालिकावीराचाही ((Man Of The Series) पुरस्कार मिळवला होता. मोहम्मद हाफीज हा पाकिस्तान संघात प्रोफेसर या टोपन नावानेही ओळखला जातो. (why mohammad hafeez is called professor)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.