भराताचा माजी फलंदाज आणि उत्तर क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) सध्या समालोचकाच्या भुमिकेतून आपल्यासामोर येत असतो. मात्र मोहम्मद कैफच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे (Instagram Post) तो पुन्हा राजकारणाच्या मैदानात (Politics) उतरणार का अशी चर्चा नेटकरी करत आहेत. मोहम्मद कैफने यापूर्वी 2014 ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh Election) वारे वाहत आहेत. याचदरम्यान भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफची एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) फारच चर्चेत आली आहे. मोहम्मद कैफने आपल्या इन्स्टाग्रामवर जुने घर असलेल्या गल्लीचे फोटो शेअर केले. मोहम्मद कैफने या गल्लीला भेट दिली होती त्याचे हे फोटो आहेत. या फोटाला त्याने 'तीच गल्ली, तेच लोग, तेच प्रेम. माझ्या अलाहबादमधील जुन्या घराच्या आठवणी ताज्या झाल्या. या गल्लीने माला क्रिकेटबद्दल, आयुष्याबद्दल आणि नात्यांबद्दल सूज्ञ केले.' असे कॅप्शन दिले.
मोहम्मद कैफचे (Mohammad Kaif) हे कॅप्शन जरी जुन्या आठवणींना उजाळा देणारे वाटले तरी नेटकऱ्यांनी याही पोस्टमध्ये राजकारण शोधले. मोहम्मद कैफच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अलाहबादचे (Allahabad) नाव आता प्रयागराज (Prayagraj) झाले असल्याची आठवण करुन दिली. काहींनी तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद कैफला तू पुन्हा निवडणुकीची तयारी करत आहेस का असा प्रश्न विचारला.
मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) 2014 ला काँग्रेसच्या तिकीटावर फुलपूरमधून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून आधी पंडित जवाहरलाल नेहरु देखील अनेकदा खासदार झाले होते. राहुल गांधींनी मोहम्मद कैफला या जागेवरुन निवडणूक लढवण्याची विनंती केली होती त्यानंतर कैफ निवडणुकीला उभारण्यासाठी तयार झाला होता. मात्र मोदी लाटेत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर काही काळांनी मोहम्मद कैफ राजकारणापासून दूर गेला आणि सामन्यांच्या समालोचनात रमला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.