नवी दिल्ली : राजस्थानमदली उदयपूर (Udaipur Murder Case) येथे 28 जून 2022 ला एक भयानक घटना घडली त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. कन्हैया लाल नावाच्या एका शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीची दोन युवकांनी त्याच्यात दुकानात घुसून हत्या केली. या दोघांनी हत्येचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडिया अकाऊंटवरून नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनात पोस्ट केल्यामुळे कन्हैया लालची हत्या झाली. (Mohammad Kaif Tweeted Over Udaipur Murder Case)
या घटनेनंतर देशभरात याचे पडसाद उमटू लागले आहेत. लोक रस्त्यावर येऊन प्रदर्शन करत आहेत. दोषींविरूद्ध कडक करावाई करण्याची मागणी देखील होत आहे. या प्रकरणावर अनेक सेलिब्रेटी आणि खेळाडू देखील आपली प्रतिक्रिया देत आहे. यात भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफचा (Mohammad Kaif) देखील समावेश आहे.
या संपूर्ण प्रकरणावर 30 जूनला मोहम्मद कैफने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. त्याने 'माझी अशी तीव्र भावना आहे की खून करणाऱ्यांचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही आणि खून करणारे कोणत्याही समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. समाजाच्या दृष्टीने उदयपूरमधील क्रूर हत्या ही लाजिरवाणी गोष्ट आहे.'
राजस्थान पोलीसचे (Rajasthan Police) अधिकारी गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी मोहम्मद रियाझ अख्तारी आणि मोहम्मद गौस यांना राजसमंदमधून अटक करण्यात आली आहे. गजेंद्र सिंह यांच्यामते दोन्ही आरोपी बाईकवरून जात होते. त्यांना नाकाबंदीच्यावेळी राजसमंदरच्या भीम भागातून ताब्यात घेतले. आरोपी उदयपूरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.