AUS vs AFG : 'वर्ल्डकप'मध्ये अफगाणिस्तानचा खेळ खल्लास! नबीनं ट्विट करत सोडलं कर्णधारपद

mohammad nabi resigns as captain of afghanistan after the loss to australia in t20 wc
mohammad nabi resigns as captain of afghanistan after the loss to australia in t20 wc
Updated on

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने टी-20 विश्वचषक 2022 च्या 38 व्या सामन्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने ट्विटरवर एका पोस्टद्वारे संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.T20 विश्वचषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 8व्या टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही.

मोहम्मद नबीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आमचा T20 वर्ल्ड कपचा प्रवास संपला आहे. आम्हाला मिळालेल्या निकालाची आम्हाला किंवा आमच्या समर्थकांनाही अपेक्षा नव्हती. सामन्यांच्या निकालाने तुम्ही जितके निराश आहात तितकेच आम्हीही निराश आहोत. गेल्या एक वर्षापासून आमच्या संघाची तयारी एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधाराला हवी असेल किंवा आवश्यक असेल त्या पातळीवर नव्हती. तसेच गेल्या काही दौऱ्यांमध्ये संघ व्यवस्थापन, निवड समिती यांच्यात समन्वय नव्हता, त्यामुळे संघाच्या स्थिरतेवर परिणाम झाला. त्यामुळे योग्य त्या सन्मानाने मी कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा करत आहे आणि जेव्हा व्यवस्थापन आणि संघाला माझी आवश्यकता असेल तेव्हा मी माझ्या देशासाठी खेळत राहीन. असे त्याने म्हटले आहे.

त्याने पुढे लिहिले की, मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो जे पावसामुळे प्रभावित होऊनही मैदानात आले आणि ज्यांनी जगभरातून आम्हाला साथ दिली, तुमचे प्रेम आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आफगाणिस्तान चिरायू राहो.

mohammad nabi resigns as captain of afghanistan after the loss to australia in t20 wc
Isudan Gadhvi: मोदींच्या होमग्राउंडवर कोण आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; जाणून घ्या

संघ एकही सामना जिंकू शकला नाही...

दरम्यान हा टी-20 विश्वचषक अफगाणिस्तानसाठी खूपच निराशाजनक होता .सुपर-12 मध्ये थेट क्वालिफाय झालेल्या या संघाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले, तर 3 सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या विश्वचषकात अफगाणिस्तान हा एकमेव संघ आहे जो एकही सामना जिंकू शकला नाही.

mohammad nabi resigns as captain of afghanistan after the loss to australia in t20 wc
AUS vs AFG : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची केली गोची; सेमी फायनलचे गणित केले अवघड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलिया फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या.ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 54 धावांचे अर्धशतक झळकावले.त्यांच्याशिवाय मिचेल मार्शने 45, वॉर्नर आणि स्टॉइनिसने प्रत्येकी 25 धावा केल्या. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने तीन बळी घेतले.

नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला 106 धावांआधीच रोखायचे होते, पण कांगारू संघाला त्यात अपयश आले.169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकांत 7 गडी गमावून 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटी रशीद खानने 23 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 48 धावांची तुफानी खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.