Mohammad Nawaz : एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला नवाझ; नियम माहिती असता तर वाचला असता

Mohammad Nawaz
Mohammad Nawazesakal
Updated on

Mohammad Nawaz : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे नव्या टार्गेटने खेळवण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत खराब सुरूवातीनंतरही 185 धावांपर्यंत मजल मारली. यात इफ्तिकार अहदमने 51 तर शादाब खानने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत मोठे योगदान दिले. तर अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाझने देखील 28 धावांची खेळी करून महत्वाच्या क्षणी भागीदारी रचली. मात्र तो विचित्र पद्धतीने बाद झाला. तो एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला.

Mohammad Nawaz
T20WC22 Point Table : ... तर भारताऐवजी पाकिस्तान जाणार सेमी फायनलमध्ये?

मोहम्मद नवाझ दक्षिण आफ्रिकेचा चायनामन बॉलर तबरेज शम्सीला स्विप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि विकेटकिपरने जोरदार अपिल केली. पंचांनीही ही अपिल उचलून धरत नवाझला बाद ठरवले. दरम्यान, नवाझ या सर्व घडामोडी घडत असताना धाव काढण्यासाठी धावला. त्यामुळे फिल्डरने ख्रो करून त्याला रन आऊट देखील केले. म्हणजे नवाझ एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला.

मोहम्मद नवाझने पायचित अपिलविरूद्ध डीआरएस घेतला नाही. कारण त्याला वाटले की तो धावबाद देखील झाला आहे. त्यामुळे याचा काही उपयोग होणार नाही. मात्र जर त्याने डीआरएस घेतला असता तर त्याला धावबाद ठरवता आला नसते. नियमानुसार ज्यावेळी अंपायर फलंदाजाला बाद देतो त्यावेळी चेंडू डेड होतो. त्यानंतर अंपायर त्याला धावबाद देऊ शकले नसते. जर नवाझने डीआरएस घेतला असता तर तो कदाचित वाचला असता. नवाझने 22 चेंडूत 28 धावांची खेळी करत पडत्या काळात पाकिस्तानला मोठा आधार दिला होता.

Mohammad Nawaz
PAK vs SA : पाऊस आफ्रिकेला नाही पावला! पाकची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

दरम्यान, पाकिस्तानने पावसाच्या व्यत्यानंतरही सामन्यावरील आपली पकड सुटू दिली नाही. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव करत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 185 धावा केल्या होत्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएसनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 14 षटकात 142 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र आफ्रिकेला 14 षटकात 9 बाद 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.