VIDEO : पुजाराचा शुन्यावर त्रिफळा उडवत शमीचे 'हटके' सेलिब्रेशन

Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Match
Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Matchesakal
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील चांगला मारा केला. तत्पूर्वी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत आपला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला. त्यानंतर मोहम्मद शमीने लिसेस्टरशायरचे दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. शमीने सॅम इवान्स आणि चेतेश्वर पुजाराला बाद केले. शमीने पुजाराला तर शुन्यावरच बाद केले. यानंतर त्याने जबरदस्त सेलिब्रेशन देखील केले. पुजारा जरी टीम इंडियाचा भाग असला तरी तो या सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळत आहे. (Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Match)

Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Match
Ranji Trophy : मध्य प्रदेशची दमदार बॅटिंग; मुंबई मोठ्या अडचणीत

शमीने पुजाराला गुड लेंथवर चेंडू टाकला. हा चेंडू बॅकफूटवर खेळणाऱ्या पुजाराच्या बॅटची कडा घेऊन यष्ट्यांवर आदळला. पुजारा बाद झाल्यानंतर शमीने धावत त्याच्या जवळ जात त्यांच्या खांद्यावर हात ठेवत उडी मारली. पुजारा सराव सामन्यात शुन्यावर बाद होणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे.

Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Match
ICC FTP : आयपीएलसाठी मोठी विंडो देण्याला पाक बोर्ड देणार आव्हान

दरम्यान, पुजारा जरी शुन्यावर बाद झाला असला तरी लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला अडचणीतून सावरले. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लिसेस्टरशायरने दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 180 धावांचा टप्पा पार केला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताकडून केएस भरत याच्याव्यतिरिक्त कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली 33 धावा करून माघारी परतला. तो पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने 25 तर शुभमन गिलने 21 धावा केल्या.

Mohammed Shami Bold Out Cheteshwar Pujara On Zero India vs Leicestershire Practice Match
Ranji Trophy : मध्य प्रदेशच्या शतकवीराचे केएल राहुल स्टाईल सेलिब्रेशन

भारत इंग्लंडमध्ये फक्त एक कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना गेल्या इंग्लंड दौऱ्यातील पुढे ढकलण्यात आलेला 5 कसोटी सामना आहे. त्यावेळी भारतीय संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला होता. या मालिकेत भारताने चार कसोटी सामन्यात 2- 1 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे हा एकमेव सामना जिंकून भारताला इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.