India vs Australia Mohammed Shami Replacement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कारणामुळे तो मोहालीला आला नाही. जिथे 20 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवला जाणार आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्या बदली खेळाडूचा शोध सुरू केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळला जाणार आहे. अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ मोहालीत पोहोचला असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. क्रिकबझ वेबसाइटनुसार, कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे.
आशिया कप-2022 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत चुका सुधाराव्यात अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, उमेश आता तंदुरुस्त आहे. त्याला मोहालीत भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. आशिया चषकातील पराभवानंतर निवडकर्त्यांना संघात अनुभवी खेळाडू हवा आहे.
मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश केला जाऊ शकतो. उमेश यादव गेल्या तीन वर्षांपासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. विशाखापट्टणम येथे फेब्रुवारी 2019 मध्ये त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता. या वर्षी जानेवारीमध्ये तो शेवटचा कसोटी जर्सीमध्ये दिसला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेश यादवने भारतासाठी केवळ सात टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 158 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 106 विकेट्स आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.