Mohammed Shami : शमीने वाढवले भारताचे टेन्शन! दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर?

Mohammed Shami
Mohammed Shami esakal
Updated on

India vs England Test : एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा गाजवणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या पुढील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील किमान पहिल्या दोन सामन्यांस शमी मुकण्याची शक्यता आहे. त्याला गुडघा दुखापतीचा त्रास झालेला असून अजून त्याने सराव सुरू केलेला नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. शमी अजून बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित झालेला नाही. येथे आल्यावरच त्याच्या तंदुरुस्तीची आणि पुनरागमनाबाबत सांगितले जाईल.

Mohammed Shami
Franz Beckenbauer : फुटबॉल विश्वात पसरली शोककळा; महान जर्मन खेळाडूचे निधन

विश्वकरंडक स्पर्धेत १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यानंतर शमी क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील संघात त्याची निवड करण्यात आली होती, परंतु तंदुरुस्तीवर त्याचे स्थान निश्चित होणार होते, परंतु बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याला तंदुरुस्त ठरवले नव्हते.

शमी तंदुरुस्त नसल्यामुळे पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा भार जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांना वाहावा लाहणार आहे. त्या कारणासाठीच आफ्रिकेतील मालिकेनंतर त्यांना आता अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

Mohammed Shami
Pro Kabaddi:..अन् शेवटच्या मिनिटाला पायरेट्सचा 'गेम' झाला! ८ पॉईंट्सने मागे असणाऱ्या बेंगलुरु बुल्सने 'असा' मिळवला विजय

भारतीय संघाला आणखी एक धक्का सूर्यकुमार यादवच्या नव्या आजाराबाबतचा बसला आहे. त्याला स्पोर्टस हर्निया झाल्याचे निदान झाले आहे. त्यावर तो परदेशात शस्त्रक्रिया करणार आहे. सूर्यकुमारचा कसोटी संघातून वगळलेले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध तो संघात नसले हे जवळपास निश्चित होते, परंतु आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो मुकण्याची शक्यता आहे.

आयपीएल संपल्यानंतर जून महिन्यात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी शमी आणि सूर्यकुमार पूर्ण तंदुरुस्त असणे काळाची गरज असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.