Mohammed Shami reacts to Shoaib Akhtar : इंग्लंडने पाकिस्तानचे विश्वविजेते बनण्याचे स्वप्न भंग केले आहे. रविवारी मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाच विकेट्स राखून विजय मिळवत टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या ज्यांचा सोशल मीडियावर बोलबाला सुरू झाला. ज्यात एक शोएब अख्तर होता.
टी-20 विश्वचषकमधील पराभवानंतर शोएब अख्तरने तुटलेल्या हृदयाचा इमोजी ट्विट केला, ज्याला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उत्तर दिले. मोहम्मद शमीने लिहिले की, माफ करा भाऊ, याला कर्म म्हणतात. सोशल मीडियावर हे पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
वर्ल्ड कप दरम्यान शोएब अख्तर सतत टीम इंडियावर टीका करत होता आणि सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा आनंद साजरा केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तान फायनलमध्ये पराभूत झाला तेव्हा मोहम्मद शमीनेही त्यांच्यावर अशी टीका केली जी व्हायरल झाली. काही मिनिटांतच मोहम्मद शमीच्या या ट्विटला हजारो रिट्विट्स आणि लाखो लाईक्स मिळाले. मोहम्मद शमीच्या या ट्विटचा यूजर्सनीही आनंद घेतला आणि लिहिले की शमी भाई रॉकीच्या मोडमध्ये आहे.
मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 137 धावा केल्या. पाकिस्तानकडून केवळ बाबर आझम (32) आणि शान मसूद (38) धावांची मोठी खेळी करू शकले, त्यांच्याशिवाय कोणीही काही करू शकले नाही. दुसरीकडे, इंग्लंडकडून सॅम करनच्या नेतृत्त्वाखालील गोलंदाजांनी शामदार गोलंदाजी केली. बेन स्टोक्सच्या (नाबाद 52) अर्धशतकाच्या जोरावर रोमहर्षक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.