T20 World Cup : बुमराहच्या जागी मोहम्मद शमी खेळणार, दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर गेला.
mohammed shami replace jasprit bumrah
mohammed shami replace jasprit bumrahesakal
Updated on

Mohammed Shami Replace Jasprit Bumrah : टी-20 विश्वचषक 2022 सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर गेला. बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मोहम्मद शमी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी तयार आहे. मोहम्मद शमी येत्या 3-4 दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर झाला तेव्हा शमीची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती.

mohammed shami replace jasprit bumrah
Deepak Chahar : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, दीपक चहर जखमी

एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, मोहम्मद शमी तंदुरुस्त असल्यास त्याला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पुढील आठवड्यात तो संघात सामील होणार आहे. शमीने काही काळापासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही. त्याला कदाचित त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. पण अनुभव पाहता तो आयसीसी स्पर्धेचा भाग होण्याचा प्रबळ दावेदार आहे. शमी 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा एक भाग होता.

mohammed shami replace jasprit bumrah
Gautam Gambhir : लखनौ सुपर जायंटच्या RPSG Group ने गंभीरला दिली 'ग्लोबल' जबाबदारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली वनडे मालिका संपल्यानंतर शमीशिवाय स्टँडबाय खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद शमीची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या परत येताना ब्रेक लागला. मोहम्मद शमी आता कोविड-19 मधून पूर्णपणे बरा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.