Mohammed Shami On Jai Shri Ram Chant : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला मुकला आहे. जरी तो टीम इंडियापासून दूर असला तरी माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे तो सतत चर्चेत येत आहे.
मोहम्मद शमीने नुकतेच टीव्ही 18 ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने जय श्रीराम आणि अल्लाहू अकबर म्हणण्याबाबत मोठं वक्तव्य केलं.
शमी म्हणाला की, 'प्रत्येक धर्मात 5-10 असे लोकं असतात जे दुसऱ्या धर्माच्या लोकांचा द्वेश करत असतात. जर मंदिर बांधलं जात असेल तर माझा त्याला कोणताही आक्षेप नाही. मग जय श्रीराम म्हणण्याला कोणता आक्षेप असेल? 1000 वेळा म्हणा जर मला अल्लाहू अकबर म्हणायचं असेल तर मी ते म्हणणार त्यानं काय फरक पडणार आहे.'
मोहम्मद शमी सध्या दुखापतीतून सावरत आहे. वनडे वर्ल्डकप संपल्यापासून मोहम्मद शमी भारतीय संघापासून दूर आहे. वर्ल्डकपदरम्यान मोहम्मद शमीने विकेट घेतल्यावर सजदा केला नाही म्हणून वाद झाला होता. त्यावेळी देखील शमीने रोखठोक उत्तर दिलं होतं. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यावेळी हा वाद निर्माण झाला होता.
त्यावर तो म्हणाला की, 'मी सलग पाचवे षटक टाकत होतो. मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त जोर लावून गोलंदाजी करत होतो. त्यामुळे मी थकलो होतो. चेंडू सारखा बॅटच्या जवळून जात होता मात्र विकेट मिळत नव्हती.'
'अखेर मला पाचवी विकेट मिळाली आणि मी गुडघ्यावर बसलो. कोणीतरी मला धक्का दिला अन् मी पुढे झुकलो. हा फोटो तुफान व्हायरल झाला. लोकानां वाटलं की मी सजदा करू इच्छितो मात्र मी केला नाही. मी त्यांना फक्त एक सल्ला देऊ शकतो. असला मूर्खपणा थांबवा.'
मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये फक्त 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी शमीने यूट्यूब चॅनलवर तो गुडघ्यावर का बसला होता याचं स्पष्टीकरण दिलं होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.