Mohammed Shami : ...म्हणून आपण पंतप्रधानांचे समर्थन केलं पाहिजे; अर्जुन पुरस्कार प्राप्त मोहम्मद शमी काय म्हणाला?

Mohammed Shami
Mohammed Shamiesakal
Updated on

Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आज प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने नावाजण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन वर्ल्डकप स्टार मोहम्मद शमीचा गौरव करण्यात आला. तो अर्जुन पुरस्कार मिळवणारा 58 वा क्रिकेटपटू आहे. दरम्यान, मोहम्मद शमीला सध्या सुरू असलेल्या मालदीव - लक्षद्वीप वादावरही आपले मत व्यक्त केलं

Mohammed Shami
Pakistan : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटने उचलले मोठे पाऊल! तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी

एएनआयशी बोलताना शमी म्हणाला की, 'आपल्याला आपल्या देशातील पर्यटणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. देश कोणत्याही रस्त्याने पुढे जात असला तरी त्यात आपलं भलं आहे. पंतप्रधान आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण त्या गोष्टीला समर्थन दिलं पाहिजे.'

भारताविरूद्ध वांशिक भेद करणाऱ्या मालदीवच्या नेत्यांविरूद्ध अनेक स्टार लोकं पुढं आली आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. मोहम्मद शमीने देखील या विषयी आपले मत व्यक्त केलं.

Mohammed Shami
साताऱ्याची अदिती अन् नागपूरच्या ओजसला अर्जुन पुरस्कार प्रदान, कोण बनला खेलरत्न? जाणून घ्या संपूर्ण यादी

जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार

केप टाऊनमध्ये भारताने ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला होता. आता भारतीय संघ 25 जानेवारीला हैदराबादमध्ये इंग्लंडसोबत पुढची कसोटी खेळणार आहे. भारत इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे 11 मार्च रोजी होणार आहे.

मोहम्मद शमी पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी शमी आपल्या गोलंदाजीत वेगळं काय करण्याचं ठरवलेलं नाही. जी जबाबदारी दिली जाईल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोहम्मद शमी म्हणाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.