Mohammed Shami Surgery: शमीनं हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर, नेमकं काय झालंय? सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

Mohammed Shami Surgery Updates : मोहम्मद शमीवर एक मोठं ऑपरेशन झालं असून सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mohammed Shami Surgery Updates
Mohammed Shami Surgery Updates
Updated on

Mohammed Shami Surgery Marathi Updates : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हॉस्पिटलच्या बेडवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या हाताला सलाईन आणि नाकामध्ये नळ्या घातलेल्या दिसत आहेत. या फोटोंमुळं त्याच्या चाहत्यांना चिंता वाटू शकते पण घाबरण्याचं कारण नाही, असं खुद्द त्यानंचं म्हटलं आहे. (Mohammed Shami Surgery Marathi Updates shared photos from hospital write an emotional post on twitter)

शमीनं ट्विट करुन दिली माहिती

शमीनं आठ तासांपूर्वी ट्विट करुन आपल्यावर ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर ट्विटमध्ये म्हटलं की, "आज माझ्या टाचेवर यशस्वी ऑपरेशन झालं आहे. आता यातून बरं व्हायला काही काळ जाणार आहे. पण पुन्हा माझ्या पायावर उभं राहण्यास उत्सुक आहे"

हे ट्विट करताना त्यानं हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या अवस्थेतील चार फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याला सलाईन आणि नाकतून नळ्या लावल्याचं दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत त्यानं थम्स अप करत आपण आता ठीक आहोत, असं म्हटलं आहे. (Latest Sport News)

Mohammed Shami Surgery Updates
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान; BJP-JDSला क्रॉस वोटिंगची भीती, काँग्रेस आमदार रिसॉर्टवर

दरम्यान, शमी यंदाच्या आयपीएलमधून बाहेर असल्याचं कारणही आता स्पष्ट झालं आहे. यामुळं गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतही तो खेळू शकला नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये तो शेवटचा खेळला होता. (Latest Marathi News)

जखमी असतानाही वर्ल्डकपमध्ये शमीनं शानदार कामगिरी केली होती. त्यानं ७ सामन्यांमध्ये २४ बळी घेतले होते. गोलंदाजी करताना करताना पाय खाली टेकवताना त्याला त्रास होत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.