Video : शेवटच्या ओव्हरमध्ये थरार! मोहम्मद सिराज अन् संजूची कमाल

शेवटच्या षटकात 15 धावा वाचवायच्या होत्या, मोहम्मद सिराज अन् संजू सैमसनची कमाल करत भारताला जिंकून दिलं
mohammed siraj and sanju samson
mohammed siraj and sanju samsonsakal
Updated on

West Indies vs India 1st ODI : भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे शुक्रवारी यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक झाला. सामन्यात अनेक चढ-उतार पाहिला मिळाली पण भारताने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अष्टपैलू रोमारियो शेफर्डने खेळ फिरवायचा प्रयत्न केला. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने भारताला विजय मिळवून दिला.

mohammed siraj and sanju samson
Shikhar Dhawan ला 3 वर्षांपासून शतकाची प्रतीक्षा, 3 धावांनी हुकली

वेस्ट इंडिजला 33 चेंडूत 57 धावा करायच्या होत्या तेव्हा शेफर्ड फलंदाजीला आला. 25 चेंडूत त्याने नाबाद 39 धावा केल्या, पण इंडिजला विजय मिळवून देऊ शकला नाही.

वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत कर्णधार शिखर धवनने दोन विकेट घेणाऱ्या सिराजकडे चेंडू सोपवला. शेवटच्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर अकील हुसेन स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. हुसेनने दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आला शेफर्ड त्याने उत्कृष्ट असा चौकार मारला.

विंडीजला आता विजयासाठी शेवटच्या 3 चेंडूत 10 धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि यानंतर सिराजने वाईड बॉल टाकला. आता फक्त दोन चेंडूत सात धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर दोन धावा झाल्या आणि शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव करता आली. मोहम्मद सिराजने अशाप्रकारे 15 धावांचा बचाव करत टीम इंडियाला हा सामना जिंकून दिला

mohammed siraj and sanju samson
Shubman Gill च्या रन आऊटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा तांडव; पाहा प्रतिक्रिया

भारताने प्रथम खेळताना शिखर धवनच्या 97 धावांच्या खेळीमुळे 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघाला निर्धारित षटकांत 6 बाद 305 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून काईल मेयर्सने 75, ब्रेंडन किंगने 54, रोमॅरियो शेफर्डने नाबाद 39 आणि अकील होसेनने नाबाद 32 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.