Mohammed Siraj Kuldeep Yadav Shine IND vs SL 2nd ODI : भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा 40 षटकात 215 धावात धुव्वा उडवला. भारताकडून मोहम्मद सिराजने 30 धावात 3 तर कुलदीप यादवने 51 झावाच 3 बळी टिपले. श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडोने अर्धशतकी खेळी केली.
भारतासाठी श्रीलंकेची वरची फळी फारशी त्रासदायक ठरत नाही. मात्र लंकेची शेपूट भारतीय गोलंदाजांसाठी जड जाते. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात देखील तळातील फलंदाजांनी झुंजारपणा दाखवत श्रीलंकेला 200 पार पोहचवले. वेलालगे (32) आणि रजिथाने नवव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचत संघाला 215 धावांपर्यंत पोहचवले.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करणाऱ्या लंकेला मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिला. त्याने अविष्का फर्नांडोला 20 धावांवर बाद केले.
त्यानंतर पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो आणि कुसल मेंडीसने डाव सावरत आक्रमक फंलदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी कुलदीपने फोडली. त्याने अनुभवी मेंडीसला 34 धावांवर बाद केले. पाठोपाठ पुढच्याच षटकात अक्षर पटेलने धनंजया डि सेल्वाला शुन्यावर बाद केले.
लंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवादिनू फर्नांडोने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर तो लगेचच धावबाद देखील झाला. गेल्या सामन्यात शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांना चांगल्याच दमवणाऱ्या दसुन शानकाची दुसऱ्या सामन्यात डाळ शिजली नाही. त्याचा कुलदीप यादवने 2 धावांवर त्रिफळा उडवत लंकेची अवस्था 5 बाद 125 धावा अशी केली. त्यानंतर कुलदीपने असलंकाला बाद करत आपली तिसरी शिकार केली.
श्रीलंकेची अवस्था 8 बाद 177 धावा झाली असताना वेलालगे आणि रजिथाने नवव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचत संघाला 215 धावांपर्यंत पोहचवले. अखेर 40 व्या षटकात सिराजने दिनुथ वेलालगे 32 धावांवर बाद केले. त्यानंतर लाहिरू कुमाराचा शुन्यावर त्रिफळा उडवत लंकेचा डाव 215 धावात गुडंळला.
हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.