Mohammed Siraj ODI Ranking : रँकिंगचा सरताज पुन्हा मोहम्मद सिराज! आयसीसीने केली मोठी घोषणा

Mohammed Siraj
Mohammed Sirajesakal
Updated on

Mohammed Siraj ICC ODI Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कप फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या घातक गोलंदाजीने त्याने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अवघ्या एका षटकात 4 विकेट घेत खळबळ माजवणाऱ्या या गोलंदाजाने आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये घातक गोलंदाजी करून संपूर्ण संघाला 50 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद सिराजला याचा चांगलाच फायदा झाला. आयसीसीच्या ताज्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवचाही टॉप 10 गोलंदाजांमध्ये समावेश आहे. मात्र, क्रमवारीत त्याचे नुकसान झाले आहे.

Mohammed Siraj
Video: ख्वाब 2011से जागा है... टीम इंडियाच चिलखत तयार, मोहीम फत्ते करण्याची केली गर्जना

मोहम्मद सिराज आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. शेवटच्या क्रमवारीत त्याचे रेटिंग 643 होते आणि तो नवव्या क्रमांकावर होता. मात्र आता त्याचे रेटिंग 694 वर पोहोचले असून जोश हेजलवूडला मागे टाकत तो नंबर वन गोलंदाज बनला. त्याने सरळ आठ स्थानांची झेप घेतली आहे.

याआधी पहिल्या क्रमांकावर असलेला जोश हेजलवूड आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता 678 आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टलाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो 677 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. मुजीब उर रहमान याआधीही चौथ्या क्रमांकावर होता आणि अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. रशीद खान 655 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कला याचा सर्वाधिक तीन स्थानांचा फटका बसला आहे. तो थेट सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.न्यूझीलंडच्या मॅट हेन्री 645 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी अॅडम झॅम्पला आठव्या क्रमांकावर आला आहे.

दुसरीकडे, कुलदीप यादवने आशिया कपमध्ये चांगली गोलंदाजी करून प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला असला तरी त्याला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. आधीच्या रँकिंगमध्ये तो 656 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर होता, पण आता रेटिंग 638 वर आली असून तो नवव्या क्रमांकावर गेला आहे. तर शाहीन शाह आफ्रिदी दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 632 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.