भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आता भारतीय संघाचा भाग आहे. आयपीएलमध्ये सिराज आरसीबीकडून खेळतो आणि त्याच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला. २०२१ मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराज संघासोबत होता आणि कांगारूंविरुद्ध भारताच्या प्रसिद्ध विजयाचाही तो भाग होता.
मोहम्मद सिराजनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २०१७ साली टी-२० क्रिकेटमधून केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्याने त्याला खरी ओळख दिली.
ऑस्ट्रेलाया दौरा सुरू होण्याआधी सिराजच्या वडीलांचं निधन झालं. पण सिराजनं भारतीय संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो मायदेशी परतला नाही. संपूर्ण दौऱ्यात सिराज वडिलांच्या आठवणीनं व्याकूळ झाल्याचं सर्वांनी पाहिलं. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीतावेळी सिराजच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
भारतीय संघातील स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
या दौऱ्यासंदर्भात सीराजने वूटवरील आगामी व्हीएस मालिका 'बंद में था दम'च्या ट्रेलर लॉन्चवेळी भाष्य केलं आहे. 'हे माझ्यासाठी खूप कठीण होते. माझे वडील देखील आयपीएल दरम्यान आजारी होते. पण, माझ्या कुटुंबीयांनी ही गोष्ट माझ्यापासून लांब ठेवली होती. ऑस्ट्रेलियात आल्यावर मला त्यांच्या (वडिलांची) स्थिती कळली. तिथे कोविड प्रोटोकॉलही पाळायचा होता. आम्हाला क्वारंटाईन करावे लागले. सराव संपल्यानंतर मला माझ्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली.
पण त्यावेळी आईने मला बळ दिले. ती म्हणाली, तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण कर आणि देशाला अभिमान वाटण्याची संधी दे, हीच माझी प्रेरणा होती. पण संघात वरिष्ठ गोलंदाज होते त्यामुळे मला खेळण्याची संधी मिळेल की नाही हेही माहीत नव्हते.
मात्र, अखेरी दुसऱ्या टेस्टमध्ये मला संधी मिळाली. जेव्हा मी कॅप परिधान केली तेव्हा मला माझे वडिल इथं असायला हवे होते असं वाटलं. अशी भावना सीराजने यावेळी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा मोहम्मद सिराज दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. मोठी गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाजीची ओपनिंग न करता सिराजने ही कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम माजी भारतीय वेगवान गोलंदाज सय्यद अबिद अली याच्या नावावर आहे, ज्यांनी १९६७ मध्ये अडलेडमध्ये ७ विकेट घेतल्या होत्या. ५३ वर्षानंतर मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.