Mohammed Siraj Steve Smith : शतक ठोकल्यानंतर स्मिथनं केलं असं काही रागाच्या भरात सिराजनं उचललं मोठं पाऊल

Mohammed Siraj Steve Smith Banter
Mohammed Siraj Steve Smith Banteresakal
Updated on

Mohammed Siraj Steve Smith WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथने आपले कसोटीतील 31 वे शतक पूर्ण केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथने जरी शतक ठोकले असले तरी भारतीय गोलंदाजांनी 4 विकेट्स घेत आपला दबदबा कायम ठेवला.

दरम्यान, या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी झुंजारवृत्ती दाखवत कांगारूंच्या मधल्या फळीला चांगलेच दमवले. भारतीय गोलंदाज पहिल्या दिवसाच्या तुलनेत आज चांगला मारा करताना दिसले. याचवेळी मोहम्मद सिराज आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण देखील झाली.

Mohammed Siraj Steve Smith Banter
Ind vs Aus WTC Final Day 2 : अजिंक्य एकटाच लढतोय, दुसऱ्या दिवसअखेर भारताचा निम्मा संघ गारद

त्याचं झालं अस की दुसऱ्या दिवसाचे पहिलेच षटक मोहम्मद सिराजने टाकण्यास सुरूवात केली. स्मिथने याच षटकात आपले शतक पूर्ण केले. 86 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिराज आणि स्मिथ भिडले. स्मिथने यापूर्वी सिराजला पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारले होते.

तिसऱ्या चेंडूवर स्मिथने सिराज क्रीजपर्यंत आल्यानंतर त्याला गोलंदाजी करण्यापासून थांबवले होते. यामुळे सिराज चिडला आणि त्याने चेंडू स्टम्पच्या दिशेने रागात फेकला. यावरून स्मिथ आणि सिराज यांच्यात वाद झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Mohammed Siraj Steve Smith Banter
WTC Final Steve Smith : 4,4... दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच स्मिथचा भारताविरुद्ध शतकी दणका!

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशीच्या 3 बाद 327 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. स्टीव्ह स्मिथने दिवसाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. या चौकारांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसाप्रमाणे याही दिवशी वर्चस्व गाजवणार असे वाटते होते. त्यात ट्रेविस हेडने आपले दीडशतक पूर्ण केले.

स्मिथ - हेड जोडी भारताला दुसऱ्या दिवशीही सतावणार असे वाटत असतानाच सिराजने ट्रेविस हेडला 163 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनला शमीने सहा धावांवर बाद करत कांगारूंचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

भारताने जरी पाठोपाठ दोन विकेट घेतल्या असल्या तरी स्मिथ अजून क्रिजवर होता. ऑस्ट्रेलिया 400 च्या जवळ पोहचत होती. स्टीव्ह स्मिथ 121 धावा करून मोठी खेळी करण्याच्या इराद्यात होता. मात्र लॉर्ड शार्दुलने त्याचा त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला. यानंतर अक्षरने मिचेल स्टार्कला 5 धावांवर धावबाद करत कांगारूंना लंचपूर्वी सातवा धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.