IND vs ENG Virat Kohli : विराटचा इगो... इंग्लंडचा संघ भारताच्या वर्मावर बोट ठेवणार?

IND vs ENG Virat Kohli
IND vs ENG Virat Kohliesakal
Updated on

Monty Panesar Virat Kohli Ego : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना हा हैदराबाद येथे होत असून भारतीय संघाचे सराव सत्र देखील सुरू झाले आहे.

भारत आतापर्यंत फार कमी वेळा मायदेशात कसोटी मालिका हरला आहे. इंग्लंडनेच 2012 मध्ये भारताला भारतात मात दिली होती. त्या मालिकेत इंग्लंडचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने भारताच्या दिग्गजांना चांगलेच दमवले होते.

IND vs ENG Virat Kohli
Indian Open Badminton : इंडियन ओपन स्पर्धेत ताय झु यिंग अंतिम फेरीत

आता याच माँटी पानेसरने यंदाच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारताला पराभूत करण्यासाठी कोणती रणनिती अवलंबावी याबाबत वक्तव्य केलं आहे. माँटी पानेसरने भारताची रन मशिन विराट कोहलीच्या इगोशी खेळण्याचा सल्ला इंग्लंडच्या खेळाडूंना दिला आहे.

पानेसर India.com शी बोलताना म्हणाला की, 'विराट कोहलीच्या इगोसोबत खेळा. त्याला मानसिकदृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी विराट कोहलीला तुम्ही चोकर्स आहात. फायनलमध्ये आला की हरता असं काहीतरी बोललं पाहिजे.'

'त्यांनी विराटसोबत या प्रकारचं स्लेजिंग केलं पाहिजे. कारण बेन स्टोक्सने वनडे आणि टी 20 वर्ल्डकप जिंकून दिला आहे. विराट कोहलीला असं काही करता आलेलं नाही. त्याची ही दुखरी नस पकडा.'

IND vs ENG Virat Kohli
Tata Mumbai Marathon : आशियातील सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत आर्मीचा दबदबा

पानेसरला या मालिकेत विराट कोहलीला सर्वाधिकवेळा कोणता गोलंदाज बाद करू शकतो असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने जेम्स अँडरसनचे नाव घेतलं. अँडरसन चांगल्या प्रकारे रिव्हर्स स्विंग करू शकतो असं पानेसरचं मत आहे.

तो म्हणाला की, मला वाटते जेम्स अँडरसन विराट कोहलीला सर्वाधिकवेळा बाद करू शकतो. तो रिव्हर्स स्विंगद्वारे विराट कोहलीला बाद करू शकतो.'

इंग्लंडचा कसोटी संघ :

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्राऊली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्ट्ली, जॅक लिच, ओली पॉप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वूड.

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.