खाशाबा जाधवांना पद्म पुरस्कार द्या; अमोल कोल्हेंची गृहमंत्र्यांकडे मागणी

Amol Kolhe Khashaba Jadhav
Amol Kolhe Khashaba Jadhavesakal
Updated on

नवी दिल्ली : स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांनी मिळवून दिले होते. मात्र अजूनही त्यांना कोणताही पद्म पुरस्कार (Padma Award) मिळालेला नाही. याच संदर्भात त्यांचे सुपूत्र रणजीत खाशाबा जाधव आणि कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी पैलवान संग्राम कांबळे यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.

Amol Kolhe Khashaba Jadhav
विराट - गांगुली वादात शाहिद आफ्रिदीने नाक खुपसले

त्यांनी या सोबत 'स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्व. पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा या मागणीसाठी त्यांचे सुपुत्र श्री. रणजित खाशाबा जाधव आणि पै. संग्राम कांबळे (कुस्ती मल्लविद्या महासंघ) यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली.'

'स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या कर्तृत्वाला न्याय मिळावा यासाठी मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितजी शाह (Amit Shah) आणि मा. केंद्रीय क्रीडामंत्री श्री. अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना तातडीने पत्र पाठवून स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याची मागणी केली.' अशी पोस्ट लिहिली.

Amol Kolhe Khashaba Jadhav
क्रीडा जगतात वर्षभरात काय घडलं? एका क्लिकवर...

या पोस्टवरील माहितीनुसार खासदार अमोल कोल्हे यांनी पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.