MS Dhoni : धोनी विसरला चक्क घरचा रस्ता... येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे विचारला रांचीचा मार्ग, Viral Video

 Dhoni Asking Directions From Strangers On Way to Ranchi
Dhoni Asking Directions From Strangers On Way to Ranchi
Updated on

MS Dhoni Viral Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी देशातील सर्व क्रिकेटपटूंमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. धोनीने यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये कोणताही सामना खेळला, प्रेक्षक स्टेडियमच्या शेवटच्या सीटपर्यंत खचाखच भरलेले होते. आयपीएल संपल्यापासून त्याचे व्हिडिओ आणि फोटो वेळोवेळी सोशल मीडियावर येत असतात.

अलीकडेच धोनी पुन्हा रांचीच्या आसपास पिकनिकला गेला होता, पण मध्येच तो त्याच्या शहराचा रस्ता विसरला. धोनीला आपली कार थांबवून लोकांना योग्य मार्गाबद्दल विचारावे लागले, ज्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

 Dhoni Asking Directions From Strangers On Way to Ranchi
Asia Cup 2023 Bangladesh Squad : आशिया कप 2023 साठी 'या' संघाची घोषणा! अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी

व्हिडीओमध्ये धोनी कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे. तो काही स्थानिक लोकांशी बोलताना रांचीचा मार्ग विचारताना दिसत आहे. दुचाकीवरील प्रश्न दोन स्थानिक लोक एमएस धोनीला रस्ता दाखवताना दिसत आहेत. धोनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकतो आणि मग हात जोडून निघून जातो.

 Dhoni Asking Directions From Strangers On Way to Ranchi
Virat Kohli Insta Post Value: 'मी एवढे पैसे घेत नाही, माझ्याविषयी खोट्या...' इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने नुकतेच गुजरात टायटन्सला हरवून त्यांचे पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. यासह त्याने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या ट्रॉफी विजयानंतर धोनी या सीझननंतरही आयपीएलमधून निवृत्ती घेईल, अशी अटकळ बांधली जात होती, पण या विजयानंतर धोनीने पुढच्या मोसमात पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली होती.

आता कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करतो की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()