MS Dhoni Birthday : धोनीला हॅप्पी बर्थडे म्हणत जडेजाने दिले मोठे संकेत

MS Dhoni Birthday Ravindra Jadeja Tweet
MS Dhoni Birthday Ravindra Jadeja Tweet esakal
Updated on

MS Dhoni Birthday Ravindra Jadeja Tweet : चेन्नई सुपर किंग्जचा थला अर्थात महेंद्रसिंह धोनी आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी, चेन्नईसाठी पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या माहीचा वाढदिवस म्हणजे तो खासच असणार. भारतासोबतच परदेशी खेळाडू देखील महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

MS Dhoni Birthday Ravindra Jadeja Tweet
MS Dhoni Birthday : क्रिकेटला क्रिकेटपण देणाऱ्या माहीचं 'शिवधनुष्य' अजूनही शाबूत..

मात्र धोनीचा संघ सहकारी रविंद्र जडेजाने धोनीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रविंद्र जडेजाने माहीभाईला शुभेच्छा देताना एक मोठे संकेत देखील दिले आहेत. रविंद्र जडेजाचे हेच ट्विट सध्या व्हायरल होत आहे. रविंद्र जडेजा आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 2009 पासूनचा आतापर्यंत आणि कायमचा माझा गो-टू मॅन! माहीभाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पिवळ्या जर्सीत लवकरच भेटू.'

MS Dhoni Birthday Ravindra Jadeja Tweet
MS Dhoni Birthday : जडेजाचा चौकार... धोनीचं डोळे मिटून घेणं अन् गंभीरला चपराक! अखेर 40 व्या वर्षी कॅप्टन्सीवरील मळभ दूर

जडेजाचे हे ट्विट वर वर जरी साधे शुभेच्छा देणारे वाटत असले तरी त्या ट्विटमधील शेवटचे चार शब्द हे खूप महत्वाचे आहेत. रविंद्र जडेजा धोनीला पिवळ्या जर्सीत पुन्हा भेटू असं म्हणतोय. धोनीने 2023 च्या हंगामातच आपण पुढचा हंगाम खेळणार असल्याचे संकेत दिले होतेच.

मात्र रविंद्र जडेजाचे आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाचे काहीतरी बिनसले आहे. जडेजा पुढचा हंगाम चेन्नईकडून खेळेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. 2022 च्या हंगामात चेन्नईने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं होते.

त्यानंतरच अशा चर्चा होत्या की जडेजा चेन्नई सोडणार. मात्र आजच्या ट्विटवरून जडेजा हा पुढच्या हंगामात देखील सीएसकेकडून खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.