MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

MS Dhoni Cyber Scam : भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट जगतात निवृत्तीनंतरही चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही.
MS Dhoni Cyber Scam News Marathi
MS Dhoni Cyber Scam News Marathisakal
Updated on

MS Dhoni Cyber Scam : भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट जगतात निवृत्तीनंतरही चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही. धोनीसाठी चाहते अजून पण वेडे आहेत. जेव्हा जेव्हा चेन्नईचा सामना असतो तेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांची गर्दी होते. पण ही बातमी महेंद्रसिंग धोनीच्या नावाने होत असलेल्या स्कॅमशी संबंधित आहे.

तर धोनीच्या चाहत्यांनो सावध राहा. खरं तर घोटाळेबाज धोनीच्या नावाने लोकांना संदेश पाठवत आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) याबाबत इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

MS Dhoni Cyber Scam News Marathi
Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

दूरसंचार विभागाने (DoT) म्हटले आहे की, घोटाळेबाज धोनीच्या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत आणि लोकांना संदेश पाठवत आहेत. व्हायरल एक्सच्या पोस्टनुसार, स्कॅमर लोकांना मेसेजमध्ये म्हणाला की “हाय, मी एमएस धोनी आहे, मी तुम्हाला माझ्या अकाउंटवरून मेसेज पाठवत आहे. मी सध्या रांचीच्या बाहेर शेतात आहे आणि माझे पाकीट विसरले आहे. तुम्ही कृपया PhonePe द्वारे मला 600 रुपये ट्रान्सफर करू शकता का... मी घरी जाऊ परत करेल? हा स्क्रीनशॉट तुम्ही ट्विटमध्ये पाहू शकता.

MS Dhoni Cyber Scam News Marathi
Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

हा फेक मेसेज शेअर करण्यासोबतच दूरसंचार विभागाने लोकांना अशा मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर मेसेजमध्ये घोटाळेबाज धोनीचा एक सेल्फी पुरावा म्हणून पाठवतो आणि त्याच्या खाली ‘व्हिसल पोडू’ असा मजकूर लिहिला जातो. हा मजकूर चेन्नईसाठी वापरला जातो.

अशी तक्रार करा

दूरसंचार विभागाने (DoT) अशा कोणत्याही संदेशावर किंवा कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही sancharsaathi.gov.in/sfc वर तक्रार करू शकता. कोणताही मेसेज आला की लगेच कळवा आणि ब्लॉक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.