MS Dhoni : जर त्यानं 20 किलो वजन कमी केलं तर... धोनी कोणत्या अफगाणी खेळाडूला चेन्नईत घेणार होता?

MS Dhoni
MS Dhoniesakal
Updated on

MS Dhoni : अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद असगर अफगाणने नुकतेच टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना 2018 च्या आशिया कपमधील मधील भारताविरूद्धच्या टाय झालेल्या सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला. असगर म्हणाला की तो सामना मला अजून आठवतो तो विसरता न येणारा क्षण आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरूद्धचा सामना आम्ही टाय केला होता.

MS Dhoni
ICC Pitch Rating : आयसीसीनं दिला दणका! वर्ल्डकप फायनल, सेमी फायनलची खेळपट्टी ही...

असगर अफगाणने सामन्याचे शेवटचे षटक टाकण्याची जबबादारी त्यांचा अव्वल फिरकीपटू राशिद खानवर सोपलवी होती. तो रविंद्र जडेजीविरूद्ध गोलंदाजी करत होती. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील हा सामना टाय झाला होता. असगर हा अफगाणिस्तानचा एक सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 2015 ते 2021 पर्यंत संघाचं नेतृत्व केलं होते. त्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेट जगतातील उदयाचे श्रेय बीसीसीआय आणि आयपीएलला दिलं.

दरम्यान, असगर अफगाणला धोनीसोबत तुझं बोलणं झालं होतं का असं विचारण्यात आलं होते. त्यावेळी असगरने एक भन्नाट किस्सा सांगितला. तो म्हणला, 'सामना टाय झाल्यानंतर मी धोनीसोबत दीर्घ चर्चा केली. तो एक जबरदस्त कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटला मिळालेलं ते गॉड गिफ्ट आहे. तो माणूस म्हणूनही उत्तम आहे.'

MS Dhoni
Schoolympics 2023 : रमणबागच्या न्यू इंग्लिशची खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात आगेकूच

असगर अफगाण पुढे म्हणाला की, 'मी त्याच्यासोबत मोहम्मद शहझाद विषयी बोललो. मी त्याला सांगितलं की शहझाद हा तुझा खूप मोठा फॅन आहे. त्यावर धोनी म्हणाला होता त्याचं पोट खूप मोठं आहे. जर त्यानं 20 किलो वजन कमी केलं तर मी त्याला आयपीएलमध्ये घेईन. मात्र शहझाद मालिका संपल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये परतला अन् त्यानं अजून 5 किलो वजन वाढवलं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.