धोनीची रोहितबद्दल 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; हा घ्या पुरावा

धोनीचं जुनं ट्वीट सध्या व्हायरल झालं आहे
Rohit Sharma and MS Dhoni
Rohit Sharma and MS DhoniGoogle file photo
Updated on

नवी दिल्ली: जगभरातील उत्तम कर्णधारांच्या नावांची यादी केली जाते, तेव्हा त्यात महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) नाव आवर्जून घेतलं जातं. धोनीला खेळाची चांगली समज होती. सामना कशापद्धतीने चालवायचा आणि कोणत्या क्षणी थोडीशी जोखीम उचलायची याचा त्याला चांगला अंदाज होता. मैदानावर असताना त्याने आयत्या वेळी केलेल्या बदलांचा अर्थ समजायला चाहत्यांना काही वेळ जायचा, पण नंतर त्याने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे अनेकदा सिद्ध झाले. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सलामीवीर म्हणून संधी देण्याचा मास्टरस्ट्रोकदेखील (Masterstroke) धोनीनेच खेळला होता. त्यात रोहितला चांगलेच यश मिळाले. त्यासोबतच धोनीने रोहितबद्दल एक भविष्यवाणी केली होती, ती देखील खरी ठरली. सध्या या भविष्यवाणीचं ट्वीट चर्चेत आलं आहे. (MS Dhoni prediction came true ahead of Rohit Sharma double century knock old Tweet goes Viral)

रोहित शर्मा
रोहित शर्मा

२०१३ मध्ये रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीवीर म्हणून भारताकडून पहिल्यांदाच उतरला. त्याच वर्षी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिलीवहिली द्विशतकी खेळी खेळली. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ ला रोहितने श्रीलंका संघाविरूद्ध दमदार 264 धावा ठोकल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही. याच विक्रमाबद्दल धोनीने एक ट्वीट केले होते. आज जर रोहित बाद झाला नाही तर तो २५० धावांचा टप्पा नक्कीच गाठेल, असं ट्वीट धोनीने केलं होतं. त्याची ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली अन् रोहितने सर्वोच्च धावसंख्या गाठली.

रोहित शर्माने त्या सामन्यात श्रीलंकेविरूद्ध १७३ चेंडूत तब्बल २६४ धावा केल्या होत्या. त्याच्या या नाबाद खेळीत ३३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. त्या सामन्यात भारताने ४०४ धावांची मजल मारली होती. तर श्रीलंकेचा संघ अवघ्या २५१ धावांत गारद झाला होता. भारताने त्या सामन्यात १५३ धावांनी विजय मिळवला होता. काही लोकांनी मजेशीर पद्धतीत, रोहित शर्माने श्रीलंकन संघाला १२ धावांनी पराभूत केले असंही म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()